मुंबई- फिटनेस क्विन शिल्पा शेट्टी तिच्या योगा आणि व्यायामासाठी जास्त चर्चेत असते. सोशल मिडियावरही ती चांगलीच ऍक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच उत्तम आरोग्याच्या टीप्स शेअर करत असते. इतकंच नाही वेगवेगळ्या आजारांवर ती योगाच्या माध्यमातून फिट कसे राहू शकाल हे देखील दाखवत असते. सध्या सगळेचजण लॉकडाऊनमध्ये घरात आहेत. अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरु आहे त्यामुळे घरात बसून पाठदुखीचा त्रास अनेकांना जाणवतोय. यावरंच शिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीने व्यायामाच्या माध्यमातून पाठदुखीवर एक सिक्रेट सांगितलं आहे. शिल्पाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय, जिथे संपूर्ण देश लॉकडाऊन सारख्या परिस्थितीतून जात आहे, लोक घरात एकाच जागेवर बसून आहेत, शरिराची हालचाल नाहीये अशा वेळी तुम्हाला थोड्या व्यायामाची गरज आहे. शिल्पा सांगतेय पाठदुखीने जे त्रस्त आहेत त्या लोकांसाठी हा खास व्यायाम आहे जो तुम्ही तुमच्या दररोज रुटीनमध्ये समाविष्ट करुन घेऊ शकतात.
अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे लोकं घरात आहेत. बाहेर फिरायला जाऊ शकत नाहीत, जीमला जाऊ शकत नाहीत त्यामुळे जर तुमच्या मांसपेशी आणि पाठीमध्ये दुखत असेल तर फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असणा-या शिल्पा शेट्टीने काही सोप्या योगा टीप्स दिल्या आहेत. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती व्याघ्रासन, मार्जारीआसान, उत्थान व्याघ्रासन इत्यादी आसने करताना दिसत आहे. ही आसने शरिराला लवचीक बनवण्यास मदत करतील.
शिल्पाने लिहिलंय, लॉकडाऊनच्या काळात घरातून बाहेर निघणं कठीण झालं आहे. त्यामुळे शरिराची हालचाल होत नाही. माझ्यासाठी माझ्या ५ वर्षांच्या मुलीला उचलणं हे माझ्या पाठीच्या खालच्या भागावर प्रभाव टाकतं. त्यामुळे मी ही वर दिलेली आसने करते. यामुळे माझी पाठ मजबुत राहते.शिल्पा नेहमीच आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि सुदृढ शरिरासाठी तिच्या टीप्स शेअर करुन चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देत असते.
shilpa shetty gave these lockdown tips to relieve back pain relieve muscle pain
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.