Shilpa Shetty News : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व्हीलचेअरवर बसून एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली. काही दिवसांपूर्वी तिच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याबद्दल सांगितले. आपल्या चाहत्यांचे लक्ष कसे वेधायचे हे शिल्पाला चांगलेच ठाऊक आहे. अलीकडेच ती वॉकर आणि व्हिलचेअरच्या मदतीने अवॉर्ड शोमध्ये पोहोचली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
शिल्पाने घेतली काळजी
शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) स्टायलिश मल्टीकलर ड्रेस परिधान केला आणि तिने आपल्या लुकची पूर्ण काळजी घेतली. शिल्पा शेट्टी वॉकरच्या मदतीने कारमधून बाहेर आली आणि त्यानंतर तिच्या एका साहाय्यकाने तिला व्हिलचेअरच्या मदतीने अवॉर्ड फंक्शनमध्ये आणले. या दरम्यान पापाराझी फोटो काढण्यासाठी आपापसात स्पर्धा करताना दिसले. (Bollywood News)
शिल्पा शेट्टी ६ आठवड्यांपासून बेड रेस्टवर
शिल्पा शेट्टीला एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पायात फ्रॅक्चर झाला होता. ती किमान ६ आठवडे बेड रेस्टवर असेल. दुखापतीनंतर सुमारे १० दिवसांनंतर, शिल्पा शेट्टीने स्वत:चा योग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की स्ट्रेचिंग न करण्याचे कोणतेही कारण नाही.
रोहित शेट्टीच्या मालिकेत
शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि शिस्तप्रिय रुटीनसाठी ओळखली जाते. वर्क फ्रंटवर, ती लवकरच रोहित शेट्टीच्या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे जे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. या मालिकेचा टीझर आधीच खूप चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.