मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सिनेमांव्यतिरिक्त तिच्या फिटनेस आणि योगासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या फिटनेस टीप्सची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत ती अनेकांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देत असते. मात्र तुम्हाला माहित आहे का शिल्पा शेट्टीने फिट राहण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेतली आहे. तुमचं उत्तर नाही असं असेल तर शिल्पाने स्वतः याविषयीचा खुलासा केला आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकांंऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुखी आणि सार्थक जीवनाची प्रेरणा देणारे १२३ वर्षांचे काशीचे प्रसिद्ध संत शिवानंद दिसून येत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने सांगितलं आहे की तिने कशाप्रकारे १२३ वर्षांच्या या संत शिवानंद बाबांकडून सुखी आणि सार्थक जीवनाची प्रेरणा घेतली.
शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'सगळ्यात सुखी माणूस, शानदार आणि सकारात्मक विभूती आहेत शिवानंद बाबा. ते १२३ वर्षांचे आहेत आणि सुखी जीवन जगण्यासाठी आमचे ते आदर्श आहेत. ते सुखी आणि सुंदर जीवनाचा एक चांगला मंत्र सांगतात. बाबांचं असं म्हणणं आहे की चांगले विचार आणि चांगले कर्म, इच्छा न ठेवता, समर्पित जीवन असेल तर आपण ईश्वरालाही प्राप्त करु शकतो. यामुळे तुमचं जीवन सुंदर बनेल..खरंच!'
शिल्पाने पुढे लिहिलंय, 'तुमच्याकडे जे काही आहे त्यात सुखी आणि समाधानी राहा. जे पण तुमच्या नशिबात असेल त्याचा पूर्ण लाभ घ्या. जास्त इच्छा आणि लोभ याचा त्याग करा. यामुळे तुम्हाला अकल्पित अशी शांती आणि आनंद मिळेल. आजच्या काळात बाबा शिवानंद यांच्यापेक्षा जीवंत उदाहरण दुसरं कोणतंच नाही. त्यांचं आयुष्य आपल्याला या वास्तवाची जाणीव करुन देतं.'
पोस्टच्या शेवटी शिल्पा सांगते, 'बाबा शिवानंद यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझ्या जीवनाचा मंत्र बनवला आहे की आनंदी राहा, समाधानी राहा आणि सकारात्मक बना.' सोशल मिडियावर शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. आश्चर्याची गोष्ट अशी की बाबा शिवानंद यांच्या वयावरुन अनेक वाद होऊ शकतात मात्र हे निश्चितपणे सांगू शकतो की ते जगातील सगळ्यात जास्त वर्ष जगणा-या लोकांमधील एक आहेत.
shilpa shetty reveals she learned beautiful and happy life mantra from 123 years old baba
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.