मुंबई: पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात (porn film racket) मुख्य आरोपी राज कुंद्रासह (Raj kundra) आठ जणांच्या विरोधात पोलिसांनी (mumbai police) गुन्हे नोंदवले आहेत. मात्र या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) साक्षीदार बनली आहे. शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह ५५ जण साक्षीदार आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे शिल्पाने पोलिसांना सांगितले आहे. राज कुंद्राने २०१५ मध्ये विहान इडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीवर शिल्पा शेट्टी ५ वर्ष संचालक होती.
२०२० मध्ये शिल्पाने या कंपनीचा राजीनामा दिला. या कंपनीशी संबध असलेल्या हॉटशॉट अॅप आणि बॉल फेम या अॅपची माहिती नसल्याचे शिल्पाने सांगितले. राज कुंद्रा मुख्य आरोपी असलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी १५०० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी हेड रायन थॉर्पलाही जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.
पुरवणी आरोपपत्रात साक्षीदार दाखवण्यात आले आहेत. शिल्पा शेट्टी त्यापैकी एक आहे. पाच साक्षीदारांना न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. त्यांनी आरोपींच्या विरोधात जबानी दिली. शिल्पा शेट्टी अजूनतरी राज कुंद्रा विरोधात काहीही बोललेली नाही. कुंद्रा आणि थॉर्प विरोधात हे पुरवणी आरोपपत्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज कुंद्राचा नातेवाईक प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना फरार आरोपी दाखवण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.