Shiv Sena MLA Disqualification Result: "हम लड़ेंगे साथी... हम लड़ेंगे...!" शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यावर मानेंची पोस्ट चर्चेत

आमदार अपात्रता निकाल लागल्यानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत
shinde group won shivsena mlas disqualification result declaired by rahul narvekar kiran mane post viral
shinde group won shivsena mlas disqualification result declaired by rahul narvekar kiran mane post viral SAKAL
Updated on

Kiran Mane on Shiv Sena MLA Disqualification Result: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. निकाल देताना नार्वेकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

या निकालानंतर नुकतेच उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलेले अभिनेते किरण मानेंनी एक हिंदी कविता करत त्यांचं मत मांडलंय.

shinde group won shivsena mlas disqualification result declaired by rahul narvekar kiran mane post viral
Shiv Sena MLA Disqualification Result: शिंदेंची सेना जिंकली! 16 बंडखोर आमदार ठरले पात्र; मुख्यमंत्रीपदही वाचलं

किरण मानेंची आमदार अपात्रता निकालावर प्रतिक्रिया

किरण मानेंनी सोशल मीडियावर त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करून माने लिहीतात,

"क़त्ल हुए जज़्बात की क़सम खाकर,

बुझी हुई नज़रों की कसम खाकर,हम लड़ेंगे साथी...

हम लड़ेंगे...

जब बंदूक़ न हुई, तब तलवार होगी...

जब तलवार न हुई, ...

लड़ने की 'लगन' तो होगी !

लड़ने का ढंग न हुआ,

लड़ने की 'ज़रूरत' तो होगी !! हम लड़ेंगे साथी... हम जीतेंगे

ज़ाहिर है कि हम ही जीतेंगे

जो दूर बड़ी... और मुश्किल है,

उस मंज़िल तक हम पहुंचेंगे !"

अशी कविता पोस्ट करुन मानेंनी आमदार अपात्रता निकालावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय. यामुळं ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे. 

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा ४५ मनिटे उशिरा नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक तासाहून अधिक काळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला. अखेर या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.