कोरोना काळात जनमाणसांचा 'देवदूत' बनलेला अभिनेता सोनू सूद हा नेहमीच त्याच्या कामांमुळं चर्चेत असतो.
Sonu Sood : कोरोना संकट (Coronavirus) काळात जनमाणसांचा 'देवदूत' बनलेला अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) हा नेहमीच त्याच्या कामांमुळं चर्चेत असतो. कोरोना काळात लोकांना त्यांच्या गावी पोहचवण्यापासून आर्थिक मदत देण्यापर्यंत सोनूनं सर्वकाही केलं, त्यामुळं तो अचानक प्रकाशझोतात आला. सोनू सोशल मीडियावरही (Social Media) नेहमी सक्रिय असतो.
नुकताच सोनू शिर्डीला (Shirdi) गेला आहे. शिर्डीला असताना सोनूनं साईकृष्ण या दुकानाला (Saikrishna Shop) भेट दिली. या दुकानामध्ये चहा, उसाचा रस आणि इतर काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सोनूनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो या दुकानाची माहिती देताना दिसत आहे. दुकानाची माहिती देता असताना तो आलेल्या ग्राहकांना उसाचा रस स्वत: बनवून देताना दिसतोय.
व्हिडिओत सोनूची मजेशीर कॉमेंट्रीही पाहायला मिळतेय. लोकही त्याच्या आजबाजूला गर्दी करताना दिसत आहेत. सोनू सूद तिथं उपस्थित लोकांना उसाचा रस बनवायलाही शिकवत आहे. व्हिडिओमध्ये सोनू म्हणतो, 'हे आहे साईकृष्णा दुकान, हे एखाद्या शोरूमसारखं आहे. इथं चहा पण मिळतो.' पुढं सोनू आलेल्या ग्राहकांना 'तुम्हाला काय पाहिजे?', असं विचारतो. त्यानंतर ते ग्राहक सोनूकडं उसाचा रस मागतात. नंतर सोनू स्वत:च्या हातानं उसाच्या रसाची मशीन सुरू करतो आणि रस तयार करायला सुरूवात करतो. या व्हिडिओला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय.
सोनू सूदनं हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, कोणाला उसाचा रस हवाय? एका ग्लासवर एक ग्लास रस फ्री. #supportsmallbusiness #shirdi.असं लिहित सोनूनं छोट्या व्यवसायांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. 'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.