Bigg Boss 16: मराठमोळा शिव ठाकरे वाघासारखा लढला पण जिंकता जिंकता हरला
Bigg Boss 16 Shiv Thakare: बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले संपन्न झाली. या ग्रँड फिनालेच्या ट्रॉफीवर एम. सी. स्टॅनने नाव कोरलंय. मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस १६ मध्ये उपविजेता ठरला. शिवचा सुरुवातीपासूनचा खेळ बघता शिव ठाकरे बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर नाव करेल असं सर्वाना वाटलं होतं. पण शिवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
बिग बॉस १६ च्या ग्रँड फिनालेसाठी शिव ठाकरे सोबतच अर्चना गौतम, एम. सी. स्टॅन, प्रियंका चौधरी आणि शालीन भानोत हे ५ जण ग्रँड फिनालेसाठी मुख्य दावेदार होते. अखेर सर्वांवर मात करून एम. सी. स्टॅनने बिग बॉस १६ ची ट्रॉफी पटकावली आहे.
(Shiv Thackeray 1st runner up of Bigg Boss 16)
बिग बॉस १६ चा ग्रँड फिनाले भव्य दिव्य रित्या आलिशान पद्धतीने पार पडला. सर्व सदस्यांचे एक से बढकर एक डान्स परफॉर्मन्स झाले. बिग बॉस १६ चे सर्व स्पर्धक यानिमित्ताने एकत्र आले. शिव ठाकरेनेउपविजेता होताच त्याने एम.सी. स्टॅनच्या आनंदात सहभाग घेत त्याचा विजयाचा आनंद साजरा केला.
शिव आणि स्टॅन दोघेही टॉप २असल्याने घरातली मंडली म्हणजेच अब्दू, साजिद खान, सुम्बुल, निमरीत, स्टॅन अशा सर्वांना आनंद झाला.
शिव ठाकरेने ट्रॉफी जरी जिंकली नसली महाराष्ट्राचं नाव मोठं झालं असून सगळ्यांना आणि विशेषतः मराठी माणसांना खूप आनंद झालाय.
शिव बिग बॉस 16 च्या घरात सुरुवातीपासून प्रत्येक टास्कमध्ये अव्वल होता. शिवने त्याच्या हुशारीने आणि ताकदीने प्रत्येक टास्क जिंकण्याचा प्रयत्न केला. शिवने घराचा कॅप्टन म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. याशिवाय घरातल्या भांडणात आणि इतर प्रसंगात शिव कायम पुढे असायचा.
शिवची अब्दु सोबतची मैत्री विशेष चर्चेत राहिली. शिव आणि अबदू यांनी घरात एकत्र धम्माल केली. अब्दू जेव्हा घरातून गेला होता तेव्हा शिव ढसाढसा रडला होता. याशिवाय शिव आणि निम्रीतची विशेष मैत्रीही घरात आणि घराबाहेर चर्चेचा विषय राहिली.
शिवचे अर्चन गौतम सोबत मोठे राडे झाले. अगदी एका भांडणात अर्चना गौतमने शिवचा गळा पकडला होता. त्यामुळे बिग बॉसने अर्चनाला घराबाहेर काढलं होतं परंतु अर्चना नंतर पुन्हा घरात आली. आणि मग पुढे शिवची अर्चानासोबत सुद्धा चांगली मैत्री झाली. एकूणच मैत्री, भांडण, हुशारी, ताकद, घरातली कामं अशा सर्व बाबतीत शिव कायम नंबर १ वर राहिला.
गेले काही दिवस देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात शिव ठाकरे साठी जबरदस्त व्होटिंग करण्यात आलं होतं. बाईक रॅली, होर्डिंग्ज अशा विविध माध्यमातून शिव जिंकावा म्हणून प्रचार करण्यात आला.
आता शिवने ट्रॉफी जरी जिंकता आली नसली तरी तो घरात वाघासारखा लढला आणि जिंकता जिंकता हरला अशीच सर्वांची भावना आहे. शिवचे आई बाबा आणि त्याच्यावर प्रेम करणारे सर्व फॅन्स खुश आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.