Shivali Parab: शिवाली अवली कोहली.. चा जन्म कोणामुळे घडला? शिवालीनेच सांगितला भन्नाट किस्सा..

विनोदाची राणी शिवाली परबची खास मुलाखत..
Shivali Parab reveal truth about shivali avali kohali in sakal unplugged podcast maharashtrachi hasya jatra
Shivali Parab reveal truth about shivali avali kohali in sakal unplugged podcast maharashtrachi hasya jatrasakal
Updated on

Shivali Parab exclusive interviews in sakal unplugged: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले.

याच कार्यक्रमातील एक अवली कलाकार म्हणजे शिवाली परब. अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख तिने मिळवली आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या विनोदाने आणि अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.

सध्या तीचं एक स्किट खूप गाजतय... ते म्हणजे 'शिवाली अवली कोहली..' या स्किट ने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यावरून अनेक मिम्स, गाणी व्हायरल झाली. पण हे नेमकं आलं कुठून.. सुचलं कुणाला.. यासंदर्भात शिवालीने भन्नाट किस्सा सांगितला आहे. सकाळ Unplugged मध्ये झालेल्या मुलाखतीत शिवालीने ही गोष्ट उलगडली.

(Shivali Parab reveal truth about shivali avali kohali in sakal unplugged podcast maharashtrachi hasya jatra)

Shivali Parab reveal truth about shivali avali kohali in sakal unplugged podcast maharashtrachi hasya jatra
The Kerala Story : महाराष्ट्रातही 'द केरळ स्टोरी टॅक्स फ्री' करा! मध्यप्रदेशात चित्रपट पाहण्यासाठी खास...

या मुलाखतीत शिवालीला विचारले गेले, की शिवाली अवली कोहली या स्किटचा जन्म कसा झाला. त्यावर शिवाली म्हणाली.. ''आम्ही सगळेच एकदा चर्चा करत बसलो होतो तेव्हा सचिन मोटे सरांच्या डोक्यातून ही संकल्पना आली. 'शिवालीला अवली कोहली हे यमक लावून एक छान नाव तयार झालं. मग सचिन गोस्वामी सरांनी त्यात अजून भर घातली आणि त्याला फुलवलं.''

'' मग लेखक म्हणून प्रसाद खांडेकरने अक्षरशः त्यात जीव ओतला आणि त्याला अजून रंगत आणली. मग त्यात संपूर्ण कुटुंब जोडलं गेलं. शिवाली, बिवाली, अवली, पावली यांच्यावर काम करून मग ते स्किट उभं राहिलं'

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुढे ती म्हणाली, ''पण यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. लोकांना ते खूप सहज वाटतं पण तो आवाज काढणं प्रचंड कठीण आहे. आणि या सगळ्यात समीर चौगुले दादाचं ही प्रचंड मोठं योगदान आहे. कारण शिवाली अवली कोहली या स्किट मध्ये तोही असतो आणि तो आम्हाला प्रतिसाद देत असतो. त्यामुळे ते स्किट यशस्वी होण्यामागे सर्वांचीच खूप मेहनत आहे.'' असं शिवाली म्हणाली.

या शिवाय शिवालीने या मुलाखतीमध्ये अनेक किस्से, काही आठवणी, वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी उलगाडल्या. त्या सविस्तर ऐकण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.