Bigg Boss Marathi 3 : कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगत आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांचं खूप जवळचं नातं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण या खेळात कधी काय घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली. ती म्हणजे तृप्ती देसाई Trupti Desai आणि शिवलीला बाळासाहेब पाटील Shivleela Patil. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याचं दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. पण, शिवलीलाची प्रकृती अचानक बिघडली आणि बुधवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ तिला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे बुधवारपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.
नुकतंच बिग बॉसच्या घरामध्ये पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले होते. घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, टास्कमधील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर त्यांना नॉमिनेट केलं होतं. यामध्ये शिवलीलाचाही समावेश होता.
नॉमिनेशननंतर काय म्हणाली शिवलीला?
“मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले, तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन, त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल”, असं शिवलीला नॉमिनेट झाल्यानंतर म्हणाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.