Shivrayancha Chhava Movie Review: छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? अंगावर उभे राहतील रोमांच

Shivrayancha Chhava Latest News : अविश्वनीय पराक्रम, असामान्य शौर्य असलेले एक महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचा भाग शिवरायांचा छावा या चित्रपटात पाहायला मिळतोय.
Shivrayancha Chhava Latest marathi Movie Review Digpal Lanjekar Chhatrapati Sambhaji Maharaj  action
Shivrayancha Chhava Latest marathi Movie Review Digpal Lanjekar Chhatrapati Sambhaji Maharaj action
Updated on

Shivrayancha Chhava Movie Review : अविश्वनीय पराक्रम, असामान्य शौर्य असलेले एक महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचा भाग शिवरायांचा छावा या चित्रपटात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अभ्यासू लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी इतिहासातील आणखी एक महत्त्वाचं पान सिनेमारुपात उलगडलय.

यंदा मात्र दिग्पाल यांनी शिवरायांचे पुत्र आणि एक महान योद्धा छत्रपती संभाजी महाराजांविषयी सिनेमा केलाय. शिवराज अष्टकातून दिग्पाल लांजेकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचं दर्शन घडवलं, शिवाय त्यांचे मावळे, शिलेदार यांचं शौर्य पाहायला मिळालं होतं. हा चित्रपट शिवराज अष्टकाचा भाग नसला तरी पुन्हा एकदा सखोल अभ्यासातून हाही चित्रपट तयार केल्याचं जाणवतं.

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास एका चित्रपटात सामावून घेणं कठीणच, म्हणूनच या भागात त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते रयतेसाठी लढणारा राजा असे काही महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळतात. शिवाय पुढील भाग येण्याची घोषणाही यात करण्यात आलीय. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत शिलेदार शंभू महारांजाची ढाल बनून कसे त्यांच्या सोबत राहतात याचही चित्रण यात पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे खंबीरपणे शंभू महाराजांच्या पाठीशी कसे उभे राहिले हे देखिल यात अधोरेखित होतं. सरसेनापती हंबीरराव या प्रवीण तरडे यांच्या चित्रपटातूनही संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळाला होता. मात्र शिवरायांचा छावा चित्रपटातून शंभू राजांचं शौर्य या चित्रपटात प्रखरपणे मांडण्यात आलय. त्यांना झालेला विरोध, अंतर्गद वाद याविषयी या चित्रपटात दाखवण्यात आलेलं नाहीय.

Shivrayancha Chhava Latest marathi Movie Review Digpal Lanjekar Chhatrapati Sambhaji Maharaj  action
Suhani Bhatnagar Death : दंगल मधल्या छोट्या बबीताचे निधन! 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हे ठरले मृत्यूचे कारण

इतिहासातील महत्त्वाच्या विविध प्रसंगातील बारकावे सादर करणं हा दिग्पाल लांजेकर यांचा हातखंडा आहे. इतिहासाचा सखोल अभ्यास आणि माहिती घेऊन चित्रपटाची मांडणी ते करतात. याही चित्रपटात ते जाणवतं.कथा, पटकथा, संवाद आणि गीत दिग्पाल लांजेकर यांनीच लिहीली आहेत. मात्र यंदा पटकथा ही काही ठिकाणी गुंता निर्माण करणारी जाणवते. शंभू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने चित्रपटाची सुरुवात दणक्यात होते. संभाजी महाराजांची एन्ट्री, गाणी, संगीत, महाराजांचे मावळे, शिलेदार, सरसेनापती यांचं आगमन त्यांचा परिचय अंगावर रोमांच उभं करणारा आहे. मात्र काही कालावधीनंतर चित्रपट धिम्या गतीने पुढे जातो आणि जास्तीत जास्त संवादांमुळे लक्ष विचलीत होऊ शकतं. उत्तरार्धात मात्र बुर्हाणपूरातील लढा लक्षवेधी ठरतो. तर शंभूराजांचा वाघासोबतचा प्रसंग छान सादर झालाय मात्र व्हिएफएक्स आणखी ताकदीचं असतं तर प्रभावी वाटलं असतं अस जाणवतं.

Shivrayancha Chhava Latest marathi Movie Review Digpal Lanjekar Chhatrapati Sambhaji Maharaj  action
58th Jnanpith Award : गुलजार यांच्यासह स्वामी रामभद्राचार्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

अभिनेता भूषण पाटील हा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकतोय. याआधी भूषणला फार कमी चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलय. मात्र त्याचा देखणा लूक आणि शरिरयष्ठी कायम चर्चेचा विषय ठरलीय. याउलट जाऊन ही भूमिका साकारणं भूषणसाठी मोठं आवाहन होतं. या भूमिकेसाठीची त्याची मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न दिसतोय. असं असलं तरीही अभिनय, संवादकौशल्याच्या बाबतीत भूषण कमी पडलाय. काही महत्त्वाचे संवाद आणि प्रसंग तितके प्रभावी सादर होताना दिसत नाहीत.

जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांची छोटीशी झलकही सुखावणारी आहे. याशिवाय तृप्ती तोरडमल, समीर धर्माधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले,सचिन भिल्लारे हे कलाकारही उत्तम काम करताना दिसतात. अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र, ईशा केसकर, दीप्ती लेले यांची कामं विशेष लक्षवेधी वाटतात. देवदत्त बाजीचं संगीत, अमर मोहिलेचं पार्श्वसंगीत यांनी चित्रपटात जीव ओतलाय. तर चित्रपटाचं संकलन आणि छायांकन उत्तम झालय.

Shivrayancha Chhava Latest marathi Movie Review Digpal Lanjekar Chhatrapati Sambhaji Maharaj  action
Raveena Tandon: मुंबईतील चौकाला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव; अभिनेत्रीनं शेअर केले खास फोटो

दिग्पाल लांजेकर यांचे चित्रपट म्हटले की प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने चित्रपटगृहात जातात. हा चित्रपट अपेक्षाभंग करत नाही मात्र काही ठिकाणी निराशा होते. असं असलं तरी हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांचा इतिहास उत्तम सादर करतो. शंभूराजांचा धगधगता इतिहास या चित्रपटाच्या माध्ममातून पाहण्याचा अनुभव समृद्ध करणारा आहे. त्यामुळे चुकवू नये असा हा चित्रपट आहे.

रेटिंग - ३ स्टार्स

चित्रपटाचे नाव - शिवरायांचा छावा

दिग्दर्शक - लेखक - दिग्पाल लांजेकर

कलाकार - भूषण पाटील, तृप्ती तोरडमल, समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले,सचिन भिल्लारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.