Balasaheb Thackeray jayanti: शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री अवघ्या मनोरंजन विश्वाला ठाऊक आहे, बाळासाहेबांच्या शेवटच्या काळातही ते बाळासाहेबांच्या सोबत होते. ही मैत्री झाली कशी त्याचाही एक भन्नाट किस्सा आहे.. त्या क्षणानंतर अमिताभ यांनी बाळासाहेबांना आपल्या हृदयात स्थान दिले..
(shivsena ambulance helped amitabh bachchan to admit in hospital and after Balasaheb Thackeray and amitabh became friend)
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांच्या कैक आठवणी प्रत्येकाच्या मनात तशाच आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा आणि प्रेम महाराष्ट्राला माहीतच आहे. त्यांचा बॉलीवूडमध्येही असाच दरारा होतो आणि मैत्रीही तितकीच होती. असाच एक त्यांच्या मैत्रीचा भन्नाट किस्सा पाहूया..
हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
झाले असे की, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'कूली' सिनेमावेळी झालेल्या अपघाताचा किस्सा अनेकांना माहीत आहे. मात्र, त्यातील एक खास बात कुणालाच माहीत नाही. 1982 साली बंगळुरूत 'कूली' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीनं मुंबईत आणण्यात आलं.
मुंबई विमानतळावरून ब्रीच कँडी हॉस्पिटलला नेण्यासाठी अमिताभ यांच्या लांबीची रुग्णवाहिका कुठे उपलब्ध होत नव्हती, तेव्हा गिरगावातल्या भडकमकर मार्ग शाखेची रुग्णवाहिका बाळासाहेब ठाकरेंनी उपलब्ध करून दिली होती
अमिताभ बच्चन या गोष्टीची जाणीव ठेवली. कारण त्यानंतर 1984 साली ज्यावेळी भडकमकर मार्ग शाखेचा वर्धापन दिन झाला, तेव्हा अमिताभ बच्चन आला होता. तेव्हा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे एकाच व्यासपीठावर आले होते. छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेते होते. तेही तिथे आले होते.
या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्नेहाचं नातं निर्माण झालं, ते पुढे कायम राहिलं. अमिताभ हे कायमच बाळासाहेबांचा खूप आदर करायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.