Pune University News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शूटिंग केलेले रॅप साँग वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
रॅप साँगमध्ये आक्षेपार्ह शब्द असल्याने आक्षेप घेण्यात आला आहे.
शिव्यांचा भडीमार असलेल्या गाण्यासाठी पुणे विद्यापीठाने परवानगी कशी दिली याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे यांनी याविषयी कुलगुरू कडे तक्रार केलीय.
(shocking complaint file against boys for shooting rap song in savitribai phule pune university)
सल्तनत नावाचे साँग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि अंतर्गत भागात चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात दारु, बंदूक, तलवार अशा साहित्याचा वापर करण्यात आलंय...
याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी या गाण्यावर आक्षेप घेत कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.
कुलगुरूंनी या गाण्याला परवानगी कशी दिली याविषयी खुलासा करावा.. याशिवाय एवढ्या मोठया विद्यापीठात हे घडतंच कसं? याला कोण जबाबदार आहे यांची चौकशी करून संबंधित आरोपींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कडुन करण्यात आलीय.
पोलिसात तक्रार केल्यानंतर हे रॅप सॉंग युट्युब वरून काढण्यात आलं आहे. मुलांनी विद्यापीठात घुसून घुसखोरी करत शूट केल्याच विद्यापीठ सांगत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग बनवल्या प्रकरणी चतुरशुर्गी पोलीसात विद्यापीठाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीसानी रॅप सॉंग बनवणाऱ्या चार - पाच मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
विद्यापीठाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना विद्यापीठात हे रॅप सॉंग बनवल्याचा मुलांवर आरोप करण्यात आलाय. पोलीस कसून चौकशी करत असून या मुलांना शिक्षा होणार का याचा खुलासा लवकरच होईल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.