Shreya Bugde: "आणि अश्रू अनावर झाले", बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक

गणपती बाप्पाचं विसर्जन करताना श्रेयाची भावुक अवस्था झालीय
shreya bugde emotional post for ganpati bappa visarjan ganesh chaturthi 2023 chala hava yeu dya
shreya bugde emotional post for ganpati bappa visarjan ganesh chaturthi 2023 chala hava yeu dya SAKAL
Updated on

Shreya Bugde post on Ganpati Visarjan: सध्या सगळीकडे गणपती बाप्पाचा उत्सव जल्लोषात सुरु आहे. गणपती बाप्पा आले की वातावरण एकदम प्रसन्न होतं. आसमंतात चैतन्य पसरतं. याच लाडक्या बाप्पाला जेव्हा विसर्जन देण्याची वेळ येते तेव्हा सर्वजण भावुक होतात.

अशीच भावुक अवस्था अभिनेत्री श्रेया बुगडेची झाली. श्रेयाने सोशल मिडीयावर बाप्पाचं विसर्जन करताना झालेली तिची अवस्था सांगितलीय.

(shreya bugde emotional post for ganpati bappa visarjan)

shreya bugde emotional post for ganpati bappa visarjan ganesh chaturthi 2023 chala hava yeu dya
Gauri Kulkarni Engagament: आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने केला साखरपुडा?

श्रेया म्हणते... "आणि अश्रू अनावर झाले"

चला हवा येऊ द्या फेम लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेने सोशल मिडीयावर बाप्पाला निरोप देतानाची भावुक पोस्ट शेअर केलीय. श्रेया लिहीते, काल ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ असे म्हणत तुझा निरोप घेतला .. आणि नेहेमी सारखे अश्रू अनावर झाले .... गेल्या इतक्या वर्षात ह्या ५ दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही ... पण एक सांगेन ह्या ५ दिवसात तुझ्यायेण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही ..

श्रेय पुढे लिहीते, "तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात ..तुझं कौतुक करतात ..तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो ..हि प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव ..तुझी सेवा करायची संधी आम्हला देत राहा !
विसर्जन फक्त म्हणायला रे , बाकी माझ्यासोबत तू असतोसच कि ...कायम दिसत राहतोस ..कधी कामात ,कधी माणसांमध्ये …"

shreya bugde emotional post for ganpati bappa visarjan ganesh chaturthi 2023 chala hava yeu dya
Parineeti - Raghav Wedding : लक्ष्मी - नारायणाचा जोडा! परिणीती - राघवचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

श्रेया शेवटी सांगते, "माझ्यावर अतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत..आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे .
Mumma म्हणते तसं "जाते नाही येते म्हणावं गं "
मग आता ..ये लौकर पुढच्या वर्षी आनंदाने ...
तुला सगळ्यासाठी खूप THANK YOU! आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहितीये आपलं)
सुखी राहा ! आनंदात राहा ..तुला खूप prem.. भेटूच"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.