गेल्या काही वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम रसिक मनांचं मनोरंजन करत आहे,न थकता,न चुकता. यातील कुशल बद्रिके,भाऊ कदम(Bhau Kadam),श्रेया बुगडे(Shreya Bugde),गणेश भारतपुरे,सागर कारंडे,डॉ.निलेश साबळे(Dr.Nilesh Sable) या सहा जणांची टीम आजतागायत कायम राहिली ते त्यांच्यातील उत्तम ट्युनिंगमुळे. केवळ कार्यक्रमा दरम्यानच नाही तर कार्यक्रमाची रिहर्सल करताना यांची मजा-मस्करी सुरूच असते. हे कलाकारच त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर .यासंदर्भातील माहिती देत असतात. त्यातनंच नको-नको ते भन्नाट खुलासे होतात,जे आपल्याला पोट धरून हसवतात.
नुकताच श्रेयानं भाऊ कदम संदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओत ती आणि भाऊ कदम 'बाहों में चले आ' हे हिंदी गाणं गुणगुणताना दिसत आहेत. पण त्याच व्हिडीओत श्रेयानं भाऊ सोबतच्या रिहर्सल दरम्यानच्या काही क्लिप्सही मधनं मधनं शेअर केल्यात. ज्यात चक्क बाईचा वेश करुन शुटिंगच्या ब्रेकमध्ये निवांत झोपलेला भाऊ कदम नकळत चेहऱ्यावर हासू आणून जातो. तसंच एका क्लिपमध्ये तर अगदी लहान मुलांप्रमाणे बागडणारा भाऊ त्याला पाहिल्यावर आनंद देऊन जातो.
या व्हिडीओला पोस्ट करताना श्रेयानं कॅप्शन मध्ये जे लिहिलंय ते त्याहीपेक्षा सॉल्लिड आहे. सेटवरचा भाऊ कदम आणि प्रत्यक्षातला भाऊ कदम कसा आहे हे यामुळे आपल्याला कळते. तिने लिहिलंय,''भाऊ अगदी खरं सांगू तर तुम्ही एक खूप मोठे philosopher आहात, तुम्ही तुमच्या सहज वागण्यातन खूप गोष्टी शिकवता, जसं की* कितीही टेन्शन असलं तरी माणसाकडे एक डुलकी काढण्या इतका वेळ असतोच,आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल मोठं होऊ द्यायचं नाही आणि आयुष्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद वेचणे''. या व्हिडीओला सध्या चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.