'संजय लीला भन्साळींनी मला सिनेविश्वात आणले अन् कलाकार म्हणून घडवले'

संजय लीला भन्साळींनी मला सिनेविश्वात आणले!
Sanjay Leela Bhansali And Shreya Ghoshal
Sanjay Leela Bhansali And Shreya Ghoshalesakal
Updated on

नवी दिल्ली : बाॅलीवूड गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) मंगळवारी (ता.१२) भावूक पोस्ट शेअर केली आहे. निमित्त होते मनोरंजन उद्योगातील तिचा २० वर्षांचा प्रवास. इन्स्टाग्रामवर 'चिकनी चमेली' गायिकेने एक व्हिडिओ शेअर करत या दिवशी, २० वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात, खूप सुंदर आणि महत्त्वाचा क्षण माझ्या आयुष्यात घडला, असे कॅप्शन दिले आहे. ती पुढे म्हणते, मी माझे पदार्पण पार्श्व गायिका म्हणून देविदास (Devdas) चित्रपटातून सुरुवात केली. मोठ्या पडद्यावरील १८ वर्षांपूर्वीचे तिचे गाणे पाहाताना आनंदाचे क्षण आणि निराशा शद्बांमध्ये मांडणे अवघड आहे. (Shreya Ghoshal Completes Her 20 Years In Bollywood, She Shared Heartfelt Note)

Sanjay Leela Bhansali And Shreya Ghoshal
आर्यन खानला पासपोर्ट परत करा, स्पेशल कोर्टाचे एनसीबीला आदेश

माझे मार्गदर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या कृतज्ञतेत मी नेहमी राहिल. त्यांनी माझा हात धरला आणि मला सिनेविश्वात आणले आणि मला कलाकार म्हणून घडवले, जे मी आज आहे. आज पुन्हा एकदा मी माझ्या आईवडिलांसमोर नतमस्तक होते. त्यांनी मला सर्वकाही दिले आणि प्रचंड मेहनत घेऊन त्यांच्या मुलाला ती जी आज आहे ते बनवले. देवाची माझ्यावर कृपा आहे ज्याने मला इतके सुंदर चाहत्यांचे कुटुंब दिले. मित्र आणि सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता आहे.

Sanjay Leela Bhansali And Shreya Ghoshal
लठ्ठपणाने तिला दिला आत्मविश्वास, अक्षय कुमारबरोबर 'या' चित्रपटात झळकणार!

व्हिडिओत गायिका तिचे स्वतःचे पहिले गीत 'सिलसिला ये चाहत का' देवदास चित्रपटातील गाताना दिसत आहे. या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित-नेने आणि ऐशवर्या राय-बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. श्रेयाने आपला पहिला राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्तम पार्श्व गायिका म्हणून देवदास चित्रपटातील 'बैरी पिया' या गीतासाठी मिळवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()