Lalita Pawar Birthday News related Ramayana Serial: मराठी मनोरंजन विश्वातील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा स्वतःचं नाव कोरलं. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे ललिता पवार.
ललिता पवार यांचं नाव घेतलं कि आठवतात त्यांच्या खलनायकी भूमिका. अनेक दशकं ललिता पवार यांनी स्वतःच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ललिता यांची गाजलेली भूमिका म्हणजे रामायण मालिकेतील मंथरा.
(Shri Ram came to Ayodhya and burnt Manthara's leg.. Then next? A unique story of actress Lalita Pawar)
रामायण मालिकेतील एक प्रसंग असा घडला कि, जो प्रसंग अभिनेत्री म्हणून ललिता पवार किती महान होत्या याची जाणीव करून देणारा आहे.
रामायण मालिकेत कैकेयीच्या मनात वाईटसाईट पसरवणारी मंथरा सर्वांच्या लक्षात राहील. एक डोळा बारीक करून कटकारस्थानं करणाऱ्या मंथराला पाहून राग यायचा. ललिता पवार यांनी मंथराची भूमिका अजरामर केली.
रामायण मालिकेतील लक्ष्मणची भूमिका साकारणारा अभिनेता सुनील लाहिरी यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.. जेव्हा भगवान राम अयोध्येहून परतत होते, तेव्हा सेटवर पणत्या लावल्या गेल्या.
या प्रसंगात ललिता एवढ्या जोशपूर्ण अवस्थेत होत्या की, त्यांचा पाय जळत्या पणतीत पडला हे त्यांना कळलेच नाही. या प्रसंगाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे दोन्ही पाय भाजले.
त्यांना दुसर्या खोलीत नेण्यात आले आणि विश्रांती घेण्यास सांगितले. परंतु हाडाच्या कलाकार असलेल्या ललिता पवार यांनी जळलेल्या पायाने शूट पूर्ण केले. कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना प्रचंड दुखत असूनही त्यांचा चेहरा शांत होता.
ललिता पवार यांना अनेक शारीरिक वेदनांना सामोरे जावे लागले. 1942 मध्ये ललिता पवार जंग-ए-आझादी या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या.
या चित्रपटात त्यांच्या विरुद्ध भगवान दादा होते. शूटिंगदरम्यान एका दृश्यात भगवान दादांना ललिता पवार यांना थप्पड मारावी लागली होती.
चुकून ती थप्पड इतकी जोरात लागली की त्याच्या डोळ्याची नस फाटली. अनेक वर्षे उपचार सुरू असतानाही त्यांच्या शरीराची उजवी बाजू काहीशी अर्धांगवायू झाली.
या गंभीर दुखण्यानंतर ललिता पवार यांनी त्यांचा मोर्चा चरित्र भूमिकांकडे वळवला. रामायण मालिकेतील मंथरा ही ललिता पवार यांनी साकारलेली चरित्र भूमिका अशीच लोकप्रिय झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.