आपल्या आभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ८० - ९० च्या दशकातली अभीनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. पण आजही तिने आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. बॉलिवूडच्या 'चांदनी' चा जन्म १३ ऑगस्ट १९६३ ला तामिळनाडूमध्ये झाला. श्रीदेवीचे वडिल वकील होते.
श्रीदेवी चार वर्षाची असताना चाइल्ड आर्टीस्ट म्हणून 'थुनैवान' या सिनेमाने अभिनयाला सुरवात केली. एकूण ३०० सिनेमे श्रीदेवीने केले आहेत. तिचा पहिला हिंदी सिनेमा 'सोल्हवां सावन' १९७८ मध्ये रिलीज झाला होता. पण १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' या सिनेमाने तिला प्रसिध्द केले. हा सिनेमा त्यावेळचा ब्लॉगब्लस्टर सिनेमा होता.
मिथूनसाठी बोनी कपूरला बांधत होती राखी
श्रीदेवी आणि मिथून यांच्यात सुरवातीला प्रेम संबंध होते. एक काळ असा होता की बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि श्रीदेवी यांच्यात घट्ट मैत्री होती. इतकेच नाही तर, संघर्षाच्या काळात मोनाने श्रीदेवीला तिच्या घरात राहण्यासाठी जागाही दिली. यादरम्यान श्रीदेवी अभिनेता मिथुन चक्रवर्तीला डेट करत होती. त्यावेळी मिथुनला असे वाटले की, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात काहीतरी सुरू आहे.
याचमुळे श्रीदेवीने बोनी कपूर यांना राखी बांधली होती, हे बोनी यांची पहिली पत्नी मोना कपूरनेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. मोनाने सांगितले होते की, मिथुनला तिच्या प्रेमाची खात्री पटवून देण्यासाठी श्रीदेवीने बोनीला राखी बांधली होती. बॉलिवूडमध्ये मिथुन आणि श्रीदेवीचे किस्से रोज चर्चेत राहू लागले. मिथुनची पत्नी गीता बाली यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी मिथुनला धमकी दिली. त्यानंतर १९८८ मध्ये श्रीदेवी आणि मिथुन वेगळे झाले.
बोनी कपूर यांच्याशी बांधली लग्नगाठ
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटादरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात जवळीक वाढू लागली होती. मात्र, दोघांमध्ये भाव-बहिणीचे नाते असल्याने बोनी कपूर यांच्या पत्नी देखील गाफील राहिल्या. मात्र, जेव्हा श्रीदेवी गर्भवती आहे आणि या बाळाचे पिता बोनी कपूर आहेत, हे कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन, श्रीदेवीशी लग्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.