कोरोनाचं संकट आणि त्यात लॉकडाउन याचा फटका सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनाही बसला आहे. अभिनेत्री श्रुती हासन Shruti Haasan सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती यावर मोकळेपणाने व्यक्त झाली. "महामारी संपेपर्यंतची मी वाट पाहत बसू शकत नाही. जेव्हा काम सुरू होईल तेव्हा मला बाहेर जाऊन काम करावंच लागेल. कारण माझी बिलं मलाच भरावी लागतात. माझे आई-वडील त्यात माझी काही मदत करणार नाहीत", असं ती म्हणाली. श्रुती ही अभिनेते कमल हासन Kamal Haasan आणि अभिनेत्री सारिका Sarika यांची मुलगी आहे. स्टारकिड असले तरी मी आर्थिक गणितांच्या बाबतीत स्वतंत्र आहे, असं तिने स्पष्ट केलं. (Shruti Haasan talks about her financial constraints said I dont have daddy or mommy helping me)
"सेटवर विनामास्क काम करणं खूप भीतीदायक असतं. मी खोटं बोलणार नाही. पण आम्हाला काम सुरू करावं लागेल, कारण मीसुद्धा इतरांप्रमाणे आर्थिक अडचणीत आहे. जेव्हा शूटिंगला परवानगी देण्यात येईल, तेव्हा मी माझं काम पुन्हा सुरू करेन. कारण माझ्यासुद्धा काही मर्यादा आहेत. मी माझ्या आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही", असं श्रुती म्हणाली.
हेही वाचा : "सलमानचा सिनेमा पाहायला गेले अन् कोरोना झाला असं त्यांनी म्हणायला नको"
श्रुतीने काही दिवसांपूर्वीच नवीन घर विकत घेतलं. मात्र त्यानंतर लगेच लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे घराचे हफ्ते भरण्यासाठीही तिला अडचणींचा सामना करावा करतोय. "या महामारीच्या काळात काही लोकांनी घर किंवा कार विकत घेतलं नाही. पण मी घर विकत घेतलं आणि सर्व समस्या सुरू झाल्या. त्यामुळे आता मला त्याचे हफ्ते भरण्यासाठी काम करावंच लागेल", असं तिने स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.