Shubhangi Atre : अंगुरी भाभीची ऑनलाइन फसवणूक; म्हणाली...

शुभांगी अत्रेने सायबर पोलिसात ९ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली
Shubhangi Atre Latest News
Shubhangi Atre Latest NewsShubhangi Atre Latest News
Updated on

Shubhangi Atre Latest News टीव्हीचा लोकप्रिय शो ‘भाबीजी घर पर है’ फेम शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) ऊर्फ ​​अंगुरी भाभीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. शुभांगी अत्रे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत क्षणोक्षणी अपडेट्स शेअर करते. नुकतेच शुभांगी अत्रे ऊर्फ ​अंगुरी भाभीला सायबर सेलचा सहारा घ्यावा लागला. कारण, शुभांगी अत्रेसोबत ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाली. त्यानंतर तिने सायबर सेलमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

शुभांगी अत्रेने वृत्तवाहिनीशी संवाद साधताना फसवणुकीची माहिती दिली. ‘८ सप्टेंबर रोजी काही गोष्टी ऑनलाइन ऑर्डर करीत होते. मी ऑर्डर दिली आणि लगेच फोन आला. तीन वर्षांपासून त्यांच्या वेबसाइटवरून खरेदी करीत आहे. अनुभव काय आहे. सोबतच त्यांनी ऑर्डरचा तपशीलही सांगितला. त्यानंतर या लोकांनी मला फक्त जीएसटीची रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. मी जीएसटीची रक्कम दिली आणि बरेच व्यवहार झाले. माझ्या खात्यातून पैसे काढले गेले’ असे शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) सांगितले.

Shubhangi Atre Latest News
पांढऱ्या ड्रेसमध्ये सोनाली सैगलचा ग्लॅमरस लूक

‘यानंतर फसवणूक (Online Fraud) झाल्याचे लक्षात आले. यामुळे सर्व एटीएम कार्ड ब्लॉक केले. माझ्यासोबत असे काही होईल, असे वाटले नव्हते. कारण, अधिकृत वेबसाइटवरून मेसेज येत होते’ असेही शुभांगी अत्रेने सांगितले. शुभांगी अत्रेने या घटनेनंतर चाहत्यांना सावध केले आहे. असे कॉल घेऊ नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका. जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आजकाल ऑनलाइन फसवणूक होत आहे, असेही ती म्हणाली.

शुभांगी अत्रेने सायबर पोलिसात ९ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. ‘महाराष्ट्र सायबर विभागात स्पेशल आयजीमध्ये कार्यरत असलेले यशस्वी यादव यांना भेटली. सायबर फसवणूक कशी होते हे त्यांनी सांगितले. मला आशा आहे की हे लोक पकडले जातील. माझ्यासाठी ती खूपच अस्वस्थ करणारी घटना होती. माझ्या खात्यातून काढलेली रक्कम ही खूप मोठी रक्कम होती असे म्हणणार नाही. परंतु, ते माझ्या कष्टाचे पैसे होते. माझ्या कष्टाच्या पैशाचा कोणी दुरुपयोग करू नये असे वाटते’ असे शुभांगी अत्रेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.