Shyamchi Aai Review: श्यामची आई पाहायला जाताय? तर मग हे एकदा वाचाच!

ओम भुतकरचा श्यामची आई सिनेमा कसा आहे? वाचा Review
shyamchi aai movie review directed by sujay dahake, starring om bhutkar gauri deshpande sandip pathak
shyamchi aai movie review directed by sujay dahake, starring om bhutkar gauri deshpande sandip pathakSAKAL
Updated on

Shyamchi Aai Movie Review: श्यामची आई. ट्रेलरपासून उत्सुकता. मराठी माणसांच्या मनामनातलं, घराघरातलं पुस्तक म्हणजे श्यामची आई. जेव्हा आचार्य अत्रेंनी सिनेमाची निर्मिती केली तेव्हा थेट सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर ना्व कोरलं. त्यामुळे श्यामची आई सिनेमा २०२३ मध्ये कोणत्या नव्या रूपात पाहायला मिळेल याची उत्कंठा शिगेला होती. पण घोर निराशा..

मुळात श्यामची आई हे पुस्तक आजही तितकंच आवडीने वाचलं जातं. पुस्तकातली प्रकरणं एकदा वाचली की विसरणं अशक्य. त्यामुळे पुस्तकातल्या शब्दांना आजच्या काळात सिनेमामाध्यमात कशी ट्रीटमेंट कशी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचा विषय. पण काहीच नावीन्य नसल्याने घोर निराशा होते.

shyamchi aai movie review directed by sujay dahake, starring om bhutkar gauri deshpande sandip pathak
Ranbir Kapoor Video: "काय हवंय तुला?" पुन्हा एकदा पापाराझीवर चिडला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल

सिनेमाची सुरुवात काहीशी आश्वासक. साने गुरुजी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देत असतात. तिथेच तुरुंगात त्यांची भेट विनोबा भावेंशी होते. दोघेही समविचारी व्यक्ती एकत्र येतात. पुढे साने गुरुजींची नाशिकच्या कोठडीत रवानगी केली जाते. आणि तिथे जन्माला येतं श्यामची आई.

सिनेमाची सुरुवात प्रेक्षकांना बांधून ठेवते. परंतु हळूहळू सिनेमा खूप संथ होतो. अगदी शेवटपर्यंत सिनेमाची संथ गती खिळवून ठेवण्यात अयशस्वी होते.

श्यामची आई सिनेमा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आहे. ही कौतुकास्पद गोष्ट. कारण त्यामुळे सिनेमाचा परिणाम आणि गांभीर्य टिकून राहतं. परंतु सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट आजच्या काळाशी सुसंगत नाही. अनेक प्रसंग एडिट करता आले असते. उदा. सावकार घरी येतो तो प्रसंग, श्यामचे लहानपणीचे काही प्रसंग. असे अनेक सीन्स थोडे कमी ठेवता आले असते तर सिनेमा आटोपशीर झाला असता.

याशिवाय साने गुरुजींचं पुढचं आयुष्य कसं होतं याचं चित्रण बघायला मिळालं असतं, तर रंगत अजून वाढली असती. सुजय डहाकेंचं दिग्दर्शन कमाल आहे, पण सिनेमा आणखी बांधून ठेवणारा हवा होता असं वाटतं.

श्यामची आई शेवटपर्यंत आपण पाहतो त्याचं एक मुख्य कारण म्हणजे कलाकारांचा अभिनय. गौरी देशपांडेने आईच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केलाय. गौरीचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात गौरीने सुंदर काम केलंय. आईचा धाक, लेकरांसाठीची धडपड, कुटुंबासाठी तळमळ, हलाखीत जगुनही जपलेला स्वाभिमान अशा अनेक भावना गौरीने प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत.

छोटा श्याम झालेला बालकलाकार शर्व गाडगीळने गोड अभिनय केलाय. निम्माहून जास्त सिनेमात शर्व दिसतो. शर्वचा अभिनय पाहून आपल्या चेहऱ्यावर आनंद झळकतो याशिवाय डोळ्यात पाणीही येतं.

मुळशी पॅटर्न मध्ये राहूल्याच्या भूमिकेत पाहिलेला ओम भुतकरने शांत, मितभाषी साने गुरुजी संयतपणे साकारले आहेत. ओमने साने गुरुजींच्या भाषेचा पकडलेला लहेजा, डोळ्यात असलेली आईची आठवण प्रेक्षक म्हणुन आपल्यालाही व्याकूळ करते. ओमच्या वाट्याला आणखी प्रसंग जर असते, तर गंमत आणखी वाढली असती, असं वाटतं राहत. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत.

shyamchi aai movie review directed by sujay dahake, starring om bhutkar gauri deshpande sandip pathak
Deepika Padukon: दीपिकाच्या रिलेशनशीपची उडवली खिल्ली, चाहत्यांची कारवाईची मागणी, व्हिडीओ बघा

एकूणच पुस्तकात वाचलेली श्यामची आई सिनेमामाध्यमात आपल्या मनावर अपेक्षित परिणाम साधत नाही. सिनेमा आणखी चांगला होऊ शकला असता. असो! कलाकारांच्या अभिनयासाठी श्यामची आई एकदा नक्कीच पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.