Shyamchi Aai Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे श्यामची आई. श्यामची आई जेव्हा पहिल्यांदा म्हणजेच १९५३ साली आलेला तेव्हा सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आता श्यामची आई नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. काय आहे या ट्रेलरमध्ये जाणुन घेऊ.
(shyamchi aai official trailer out now starring om bhutkar gauri deshpande sarang sathe)
श्यामची आई सिनेमाचा ट्रेलर
ओम भुतकर दिग्दर्शित श्यामची आई सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, छोट्या श्यामवर त्याची आई संस्कार करत असते. त्याचे बाबा सुद्धा स्वातंत्र्यचळवळीच्या लढ्यात स्वतःला झोकुन देतात.
अशातच श्याम मोठा होत असतो. हाच श्याम पुढे मोठा होऊन साने गुरुजी म्हणुन नावारुपाला येतो. साने गुरुजी सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांना विरोध करायला सज्ज असतात. त्यांची भेट तुरुंगात विनोबा भावेंशी होते.
साने गुरुजी कितीही मोठे झाले तरीही आयुष्याच्या प्रत्येक पावलावर त्याला आईची शिकवण आठवते.
श्यामची आई सिनेमातले कलाकार
'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,
सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
श्यामची आई सिनेमाची रिलीज डेट
बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर , आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.
साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. १० नोव्हेंबर २०२३ ला श्यामची आई सिनेमाचा कृष्णधवल ऐतिहासिक अनुभव प्रेक्षकांना घेता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.