Siddharth Jadhav: ज्यांच्या आशिर्वादाने मी जग फिरलो आज ते.. आई - बाबांच्या पहिला परदेश दौऱ्यानिमित्त सिद्धू झाला भावुक

अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या आई - बाबांसाठी पहिल्या परदेश ट्रीपचा प्लॅन आखला
siddharth jadhav marathi actor feeling emotional about his parents first foreign trip
siddharth jadhav marathi actor feeling emotional about his parents first foreign trip SAKAL
Updated on

Siddharth Jadhav News: अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडीयावर कमालीचा सक्रिय असतो. सिद्धार्थ जाधवने जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, हुप्पा हुय्या, दे धक्का अशा अनेक मराठी सिनेमांमधून याशिवाय गोलमाल, सिंबा, सर्कस अशा हिंदी सिनेमांंमध्ये अभिनय केलाय.

कोणत्याही मुलाला आई - बाबांची सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ईच्छा असते. आई - बाबांचं असंच एक स्वप्न सिद्धूने पूर्ण केलंय. सिद्धूने त्याच्या आई - बाबांना पहिल्यांदाच परदेश वारीला पाठवलंय.

(siddharth jadhav marathi actor feeling emotional about his parents first foreign trip)

siddharth jadhav marathi actor feeling emotional about his parents first foreign trip
Gadar 2 च्या खलनायकाने १२ वर्ष झाली डोक्यावर एकही केस उगवु दिला नाही, हे आहे खास कारण

सिद्धूची आई - बाबांच्या पहिल्या परदेशवारीसाठी खास पोस्ट

सिद्धुने सोशल मिडीयावर आई - बाबा एअरपोर्टवर असल्याचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करुन सिद्धू लिहितो... "This is the "moment " ... आई बाबांचा पहिला परदेश दौरा... माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे , हे मी शब्दात नाही सांगू शकत... त्यांच्या आशीर्वादाने "मी जग बघायला फिरलो "आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने "मी त्यांना जग बघायला पाठवतोय..."

त्यातला आज त्यांचा हा "पहिला प्रवास..." माझ्या शाळेतल्या पहिल्या सहली पासून ते आतापर्यंत लंडन ला शूटला जाईपर्यंत जी excitment , जो आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त excitment,तसाच आनंद आज मला वाटतोय.... ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय.. तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको.. मी आहे तुमच्यासोबत..... कायम.... सिध्दू ...."

सिद्धार्थ दिसण्यावरुन झाला ट्रोल

सिद्धार्थ सहसा ट्रोलिंगवर लक्ष देत नाही. त्याला नेहमीच त्याच्या दिसण्यावरून ट्रोल केलं जात. मात्र तो त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्याचबरोबर तो ट्रोल करणाऱ्यांना देखील मजेशीर रिप्लायही देतो. मात्र काही दिवसांपुर्वी सिद्धूने राग व्यक्त केला होता

सिद्धार्थने सोशल मिडीयावर त्याचा राग व्यक्त केला. सिद्धार्थने अतिशय शांतपणे ट्रोलर्सलाही सुनावले.

सिद्धार्थने ट्रोलर्सला चांगले सुनावले

एका कमेंटमध्ये नेटकऱ्याने सिद्धार्थला शिवी दिली होती. तर सिद्धार्थने ती पोस्ट शेयर करण्याबरोबरच 'ट्रोलिंग मान्य आहे, पण शिवी देणं कितपत योग्य आहे? फक्त विचारतोय', असं सणसणीत उत्तर दिल आहे. सिद्धार्थच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली.

ट्रोल करणाऱ्यांनी जरा भान ठेवावं. आपण कुणाला काय बोलतोय. त्याची ओळख काय आहे आणि तो आपलं मनोरंजन करण्यासाठी किती मेहनत घेतो याच थोडं भान ठेवण्याचा सल्ला सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्या ट्रोलरला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.