Siddharth Shukla: अभिनेता नाही तर 'या' क्षेत्रात सिद्धार्थ शुक्लाला करायचे होते करिअर

सिद्धार्थ शुक्लाची आज जयंती. चाहते त्याच्या आठवणीत आजही हळहळ व्यक्त करत असतील
siddharth shukla birth anniversary siddharth want to be career as interior designer
siddharth shukla birth anniversary siddharth want to be career as interior designerSAKAL
Updated on

Siddharth Shukla Birth Anniversary: सिद्धार्थ शुक्लाची आठवण त्याच्या फॅन्सना प्रत्येक दिवशी येत असेल यात शंका नाही. सिद्धार्थची एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. सिद्धार्थने बिग बॉस १३ चं विजेतेपद पटकावलं होतं. सिद्धार्थने फार कमी काळात एक लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख मिळवली. सिद्धार्थची आज बर्थ अॅनिव्हर्सरी. त्यानिमित्ताने जाणुन घेऊ सिद्धार्थविषयी खास गोष्टी.

siddharth shukla birth anniversary siddharth want to be career as interior designer
Lookback 2023: 'या' मराठी चित्रपटांनी २०२३ मध्ये थेट हिंदी सिनेमांना टक्कर देऊन बॉक्स ऑफीस गाजवलं

सिद्धार्थला अभिनेता नव्हे तर या क्षेत्रात करायचं होतं करिअर

सिद्धार्थ शुक्ला हा सुरुवातीपासून क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होता. शाळेमध्ये असल्यापासूनच सिद्धार्थने फुटबॉल आणि इतर खेळांमध्ये दमदार कामगिरी केली.

सिद्धार्थला अभिनेता नव्हे तर इंटेरिअर डिझायनर व्हायचं होतं. सिद्धार्थने यासाठी इंटेरियर डिझायनरचा कोर्स केला होता.

चाहते सिद्धार्थच्या आईची घेतात काळजी

टीव्ही मनोरंजन विश्वातला प्रसिद्ध चेहरा आणि 'बिग बॉस 13'चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन होऊन आता 2 वर्षांहून अधिक काळ लोटला गेला आहे, त्याच्या चाहत्यांना नेहमी त्याची आठवण येते. त्याच्या मृत्यूनंतर चाहते सिद्धार्थची आई रिटा यांची पूर्ण काळजी घेतात.

सिद्धार्थ शुक्लाचं निधन कसं झालं?

सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर 2021ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो फक्त 40 वर्षांचा होते. 'बिग बॉस 13' चा विजेता झाल्यानंतर तो यशाच्या शिखरावर होता. वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम करत होता. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.