Sidharth Malhotra: नेपोटीजम विषयी सिद्धार्थ मल्होत्राचं मोठं विधान! म्हणाला..

प्रयत्न करणे सोडू नका, तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही.. सिद्धार्थचं सडेतोड उत्तर..
Sidharth Malhotra success mantra he said never stops trying is hard to beat
Sidharth Malhotra success mantra he said never stops trying is hard to beat sakal
Updated on

sidharth malhotra: बॉलिवूड मध्ये बरेच दिवस "नेपोटिझम"अर्थात घराणेशाहीला घेऊन वाद सुरू आहेत. पण सिद्धार्थ मल्होत्राने यांवर वेगळी आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

(Sidharth Malhotra success mantra he said never stops trying is hard to beat )

सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, जेव्हा तुम्ही बॉलीवुडमध्ये बाहेरून येता, तुम्हाला कुणाचाही पाठिंबा नसतो तेव्हा येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितले. वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्यासमवेत करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून २०१२ मध्ये सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर सुरू झालेला त्याचा बॉलीवुडचा प्रवास अजूनही सुरू आहे.

सिद्धार्थ पुढे सांगितले की, माझ्यासाठी एखादा चित्रपट मिळवणे सोपे नव्हते. कुटुंबातील कोणीही मनोरंजन विश्वात नाही. लोकांना माझे चित्रपट आवडत आहेत म्हणून मला अजुन नाव ठेवली नाहीत. इंडस्ट्रीत नवीन येणाऱ्या व्यक्तीला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम हेच तरुन नेते.

सिद्धार्थ पुढे म्हणाला की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या हातात काहीच नसते. कारण चित्रपटा चालेल की नाही यावर कोणाचेच नियंत्रण नसते. तुम्ही फक्त तुमचा सीन आणि शॉट्स चोख देण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. एवढे करूनही जेव्हा चित्रपट चालत नाही तेव्हा माध्यमांनी बनवलेली मते डोक्यात घर करून राहतात. पण अशावेळी जिद्द, चिकाटी आणि सातत्य असणारी वृत्ती नेहमीच उपयोगी पडते. कारण जो प्रयत्न करणे थांबवत नाही त्याला हरवणे फार कठीण असते.

सिद्धार्थ सध्या अजय देवगण आणि दिशा पटानी आणि राशि खन्ना यांच्यासोबत ''थँक गॉड' मध्ये दिसणार आहे तर डिसेंबरमध्ये त्याचा 'योध्दा' हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्या शिवाय रश्मिका मंदान्ना आणि रोहित शेट्टी यांच्या वेब शो 'इंडियन पोलिस फोर्स'सोबत 'मिशन मजनू'मध्येही तो दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.