Sidhu Moose Wala च्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी, ईमेलमध्ये सलमान खानचेही नाव

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मेलमध्ये सलमान खानचेही नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.
sidhu moose wala and salman khan
sidhu moose wala and salman khan Sakal
Updated on

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. ही धमकी त्याला मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. ईमेलमध्ये बलकौर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांची नावे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये अभिनेता सलमान खानचेही नाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना एक पत्र आले होते, ज्यामध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

sidhu moose wala and salman khan
Tunisha Sharma Suicide Case: अखेर 70 दिवसांनी शीझान खान तुरुंगाबाहेर! मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत पोलिसांना माहिती असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल राजस्थानमधून पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.

मुसेवालाच्या वडिलांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही अशीच धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. त्यानंतरही लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्याबद्दल काही बोलले तर ते त्यांना ठार मारतील, असे म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बलकौर सिंह यांनी प्रत्येक धमकीनंतर आपण घाबरत नसल्याचे सांगितले आहे.

गेल्या वर्षी 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांना पंजाबमधील मानसा येथे रस्त्यातच गोळी मारण्यात आली होती. मूसेवाला आपल्या मित्रासोबत जीपमध्ये बसून गावाकडे जात होता, तेव्हा रस्त्यात अनेकांनी त्याला घेरले आणि कारवर गोळीबार केला, ज्यामध्ये मूसेवालाचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.