Sidhu Moose Wala Father Reaction Lawrence Bishnoi interview : प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवालाच्या हत्याकांडानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोईवर त्या हत्येचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात त्याची एक मुलाखत व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्यानं जे धक्कादायक खुलासे केले यामुळे वेगळ्याच प्रकारच्या चर्चेचा उधाण आल्याचे दिसून आले आहे.
मुसेवालाच्या हत्येला आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्या स्मृतीदिनानिमित्त त्याचे वडील बालकौर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. मुलाची हत्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतूकही केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या येण्यानं युपीमध्ये माफिया राज, डॉन यांना चांगलाच लगाम घातला गेला आहे.
Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
येत्या काळात देशातील जे गुन्हेगार आहे त्यांना योगींनी शिक्षा घडवावी त्यांनी केलेल्या कामाची त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी असल्याचे बालकौर सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी लॉरेन्स बिष्णोईची जी मुलाखत व्हायरल झाली होती त्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ते माफिया सगळे माझ्या घरात घुसले हे सगळं माहिती असताना देखील पंजाब सरकारनं काही केलेलं नाही. अशावेळी मला युपीच्या मुख्यमंत्र्यांची खूप आठवण येते.
मी एक गोष्ट खात्रीनं सांगू इच्छितो की, येत्या काळात तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांना मतदान करण्यास उत्सुक असाल. कारण परिस्थिती अशीच आहे. तुम्ही म्हणता युपी साफ आहे तर मग पंजाब जे होते आहे त्यावर कुणीच कशी काय कारवाई करत नाही. असा प्रश्नही सिंह यांनी यावेळी उपस्थित केला.
२९ मे २०२२ रोजी सिद्धु मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा संबंध हा पंजाबमधील इतर हत्याकांडाशी जोडण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी मुसेवाला हत्याप्रकरणात बिष्णोईला मुख्य आरोपी म्ह्टले आहे. यानंतर गोल्डी बराकचे नाव देखील समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी बिष्णोईची एक मुलाखत व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्यानं केलेल्या खुलाशांनी मुसेवालाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
ती मुलाखत व्हायरल झाल्यानंतर मुसेवालाच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. माझ्या मुलाचा दुसऱ्यांदा मृत्यू झाला असे त्यांनी म्हटले आहे. एखादा आरोपी अशाप्रकारे सगळ्यांसमोर मुलाखती देत असेल तर त्याला काय म्हणावे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.