Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; बलकौर सिंग यांनी शेअर केला बाळाचा पहिला फोटो

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर (Charan Kaur) यांनी मुलाला जन्म दिला आहे.
Sidhu Moose Wala
Sidhu Moose Walaesakal
Updated on

Sidhu Moose Wala: दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर (Charan Kaur) या दुसऱ्यांदा आई झाल्या आहेत. चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग (Balkaur Singh) यांनी नुकताच बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बलकौर सिंग यांनी शेअर केला फोटो

बलकौर सिंग यांनी बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "परमेश्वराने शुभदीपच्या लहान भावाला आमच्या मांडीवर ठेवले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि त्याच्या आईची तब्येत बरी आहे. सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे."

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते बाळाला मांडीवर घेऊन बसलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या जवळ सिद्धू मुसेवालाचा फोटो देखील ठेवलेला दिसत आहे. या फोटोमध्ये बलकौर सिंह यांच्यासमोर केक ठेवलेला दिसत आहे.

बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या पोस्टला कमेंट करुन बलकौर सिंग आणि चरण कौर यांना शुभेच्छा दिल्या.

सिद्धूच्या वडिलांच्या या पोस्टला जवळपास 2 लाख लाईक्स आणि 3500 हून अधिक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवालानं पंजाबच नाही तर देशारात विशेष ओळख निर्माण केली. सिद्धुच्या जाण्यानं त्याच्या कुटूंबियांवर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आता सिद्धूच्या भावाच्या जन्मानंतर त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala: "आमच्या कुटुंबाची काळजी करणाऱ्या..."; पत्नीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची पोस्ट

सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासह 25 जणांना अटक करण्यात आली होती. सिद्धूच्या मृत्यूला दोन वर्ष झाली असली तरी देखील तो आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात तो जिवंत आहे. सिद्धू मुसेवालाचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले. सिद्धूचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू, असं होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.