बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक(Bollywood famous Singer) KK मंगळवारी ३१ मे,२०२२ रोजी अचानक लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं मृत्यूमुखी पडला. त्याच्या कुटुंबाला या बातमीनं मोठा धक्का पोहोचला आहे. तर दुसरीकडे म्युझिक इंडस्ट्री देखील केके च्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सुन्न झाली आहे. केके चा मंगळवारी ३१ मे रोजी, कोलकाता इथं प्रसिद्ध ऑडिटोरियम नजरुल मंचमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होता. या दरम्यान केके ची तब्येत अचानक बिघडली आणि नंतर लगेचच त्चाच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. (Singer KK death: Nazrul Mancha employee says venue was overcrowded, bouncers sprayed foam)
कोणालाच काही कळत नव्हतं की केके सोबत हे असं कसं घडलं? केकेच्या डोक्यावर,चेहऱ्यावर मार लागलेल्या खुणाही दिसल्या,ज्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या आणि नजरुल मंचच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. ज्यामध्ये काही धक्कादायक खुलासे झाले. दावा केला जात आहे की ज्या ऑडिटोरियमची आसनक्षमता अडीच हजार इतकीच होती तिथे तब्बल साडे चार-पाच हजार लोकांची गर्दी होती. म्हणजे दुप्पट संख्येनं लोकं भरली होती. गर्दीला अवरणं देखील कठीण झालं होतं. आणि बाऊन्सर्स त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाछी फोम स्प्रे चा देखील वापर करीत होते.
एएनआय च्या म्हणण्यानुसार,नजरुल मंचच्या एका कर्मचाऱ्यानं चौकशीत म्हटलं आहे की,ऑडिटोरियम मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांची गर्दी होती. ऑडिटोरियमची क्षमता दोन ते अडीच हजार होती पण तिथे ५ हजार लोक उपस्थित होते. ती गर्दी केकेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. कंट्रोल करणं खूप कठीण झालं होतं. गर्दीता कंट्रोल करण्यासाठी बाऊन्सर्सनी फोम स्प्रेचा वापर अनेकदा केला .
ऑडिटोरियमच्या कर्मचाऱ्यानं हे देखील नमूद केलं आहे की,केके ऑडिटोरियम मध्ये असताना त्याला काहीच झालेलं नव्हतं. त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून त्यानं थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला होता. आणि मग काही वेळात तो पुन्हा परफॉर्म करू लागला.
तर आणखी एका वृत्त वाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार समोर आलंय की,ऑडिटोरियम मधील गर्दीला बाहेर काढण्यासाठी अश्रू धुराचा देखील वापर केला गेला होता. ज्या संदर्भातला एक व्हिडीओ देखील समोर आला होता. काही आणखी व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये केके खूप अस्वस्थ वाटत आहे. तो घामाघूम झालेला देखील दिसत आहे. एका व्हिडीओत केके सारखा-सारखा आपला चेहरा टॉवेलनं पुसताना दिसत आहे. आणि एसी काम करत नाहीय अशी तक्रार देखील करताना दिसत आहे. जेव्हा त्याला खूप त्रास होऊ लागला तेव्हा त्यानं शो थांबवला. पण थोड्या वेळानं बरं वाटल्यानं तो पुन्हा परफॉर्म करू लागला. आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये केकेची टीम ऑडिटोरियममधून हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.