Good News : श्रेया घोषालने दिला मुलाला जन्म

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Shreya Ghoshal
Shreya Ghoshal
Updated on

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने Shreya Ghoshal आज (२२ मे) मुलाला जन्म दिला. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. 'आज दुपारी देवाने आम्हाला मुलाच्या रुपात अमूल्य आशीर्वाद दिला आहे. हा अत्यंत भावनिक क्षण आहे. शिलादित्य Shiladitya आणि मी हा आनंद संपूर्ण कुटुंबीयांसोबत साजरा करत आहोत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद', अशी पोस्ट तिने लिहिली. श्रेया आणि शिलादित्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Singer Shreya Ghoshal And Husband Shiladitya Welcome A Baby Boy)

मार्च महिन्यात श्रेयाने फोटो पोस्ट करत घरी लवकरच पाळणा हलणार असल्याची गोड बातमी दिली होती. श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्नगाठ बांधली होती. नवी दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. श्रेया तिच्या खासगी आयुष्याविषयी फार व्यक्त होत नाही. त्यामुळे तिच्या लग्नाचे फोटोसुद्धा काही वर्षांनी समोर आले होते.

Shreya Ghoshal
वयाच्या ३९व्या वर्षी आजी बनली 'ही' अभिनेत्री; हृतिकसोबत केलंय काम

दूरदर्शनवरील 'सा रे ग म प' या गायनस्पर्धेत श्रेयाने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'देवदास' या चित्रपटासाठी तिने पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. श्रेयाने हिंदीसोबत इतर भाषांमधीलही अनेक गाणी गायली आहेत. पार्श्वगायनासोबतच ती काही रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही झळकली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()