एकल पिता असलेला तुषार कपूर जोडीदाराच्या शोधात

लग्नाविषयी व्यक्त केल्या भावना
Tusshar Kapoor
Tusshar Kapoor Instagram/ Tusshar Kapoor
Updated on

अभिनेता तुषार कपूरने (Tusshar Kapoor) २०१६ साली आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेत सरोगसीद्वारे लक्ष्य या मुलाचा स्वीकार केला. तुषार हा लक्ष्यचा एकल पिता असून त्याच्या संगोपनाची जबाबदारी तो स्वत: पार पाडत आहे. अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिचा भाऊ असलेल्या तुषारने अद्याप लग्न केलं नाही. तुषारने त्याच्या आताच्या प्रवासावर एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. 'बॅचलर डॅडी: माय जर्नी टू फादरहूड अँड मोअर' असं या पुस्तकाचं नाव आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुषारने लग्नाविषयीची त्याची इच्छा बोलून दाखवली.

'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तुषार म्हणाला, 'योग्य जोडीदार शोधण्यासाठी मी तयार आहे. मी लग्न करण्यासाठी तयार आहे. पण आता मला काहीसं अधुरं वाटतंय, अशी गोष्ट नाही. नशिबात कोणती गोष्ट कधी मिळेल याचा काही अंदाज नाही. त्यामुळे कोणत्याच गोष्टीला मी नाही म्हणत नाही.'

Tusshar Kapoor
'शेफालीला किस करताना भावना जागृत झाल्या तर?'; किर्तीने सांगितला अनुभव

तुषारने २००१ साली त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तुषारने 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जीना सिर्फ मेरे लिए', 'कुछ तो है' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र तुषारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. तुषारने रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल' चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. २००६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही त्याने तीच भूमिका साकारली. तुषार सध्या अभिनयापासून दूर असून निर्मिती क्षेत्रात काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.