Sirf Ek Banda Kafi Hai Review : आसाराम बापूचा भरला घडा, वकीलानं शिकवला चांगलाच धडा!

आसाराम बापूला देव मानायची लोकं. त्याचे भक्त देश, विदेशात होते. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. पण आसाराम बापूच्या आश्रमात जे काही सुरु होतं त्यामुळे त्याची चांगलीच बेइज्जती झाली.
Sirf Ek Banda Kafi Hai Review
Sirf Ek Banda Kafi Hai Review
Updated on

Sirf Ek Banda Kafi Hai Review : कुणी काही का म्हणेना पण तेव्हा आसाराम बापूची गोष्टच वेगळी होती. त्यांचे दररोज एका चॅनेलवरुन होणारी अमृतवाणी, त्यानंतर त्यांच्या संत्सगाला होणारी गर्दी, मोठमोठ्या सेलिब्रेटींनी त्याला लावलेली हजेरी हे सारं काही थक्क करणारं होतं. आसाराम बापूला तरी काय माहिती ज्यांच्या जीवावर आपण हे सारं वेगळं विश्व तयार केलं उद्या तेच आपल्याला रस्त्यावर आणतील. शेवटी झालंही तसचं.

आसाराम बापूला देव मानायची लोकं. त्याचे भक्त देश, विदेशात होते. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. पण आसाराम बापूच्या आश्रमात जे काही सुरु होतं त्यामुळे त्याची चांगलीच बेइज्जती झाली. जेलमध्ये रवानगी झाली. न्यायालयानं शेवटी शिक्षाही सुनावली होती. हे सारं काही धक्कादायक होतं. सुरुवातीला सगळ्यांनाच यावर विश्वास कसा ठेवायचा याविषयी शंका होती. पुढे न्यायालयात खटला सुरु झाला. पुरावे, साक्षीदार उभे राहिल्यावर आसाराम बापू काय होते हे साऱ्या जगाला कळले.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या सिर्फ एक बंदा काफी है नावाच्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामध्ये लोकांनी ज्याला देवस्थानी मानलं त्या आसाराम बापूची गोष्ट सांगण्यात आली आहे. बाबानं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोर्टानं शिक्षा ठोठावली होती. यासगळ्यात आसाराम बापूच्या विरोधात ज्या वकीलानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती त्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे.

सिर्फ एक बंदा काफी है हा चित्रपट एक कोर्टरुम ड्रामा आहे. ज्यामध्ये मनोज वाजपेयीनं एका वकिलाची प्रमुख भूमिका साकारली आहे. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सोशल मीडियावर कौतूक होताना दिसत आहे. कित्येकांनी मनोजच्या भूमिकेचे कौतूक केले आहे.

गुलमोहर नावाच्या सीरिजनंतर मनोजचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पी सी सोलंकी नावाच्या वकीलाची ही कथा असून आसाराम बापूला जेलमध्ये पाठवण्यात त्यांची भूमिका मोठी होती.

Sirf Ek Banda Kafi Hai Review
मोदींच्या हिंदुत्वाला जागा नाही.. UK मध्ये The Kerala Story दरम्यान मुस्लिम कार्यकर्त्याचा राडा

त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो. त्यानंतर तिचे आई वडील दिल्लीच्या कमल नगर पोलीस ठाण्यात तक्रारही करतात. आणि बाबाच्या विरोधात केस दाखल होते. पोलीस बाबांना अटकही करते. मात्र त्याचवेळी भक्तांचा संताप होतो. ते काही केल्या ऐकत नाही. दुसरे वकील पैसे घेऊन ती केस मिटवण्याच्या तयारीत आहे. अशावेळी त्या आई वडिलांना पी सी सोलंकी नावाचा वकील आधार देतो. मी तुमची केस लढवणार असे सांगून त्यांना बळ देतो. त्यानंतर जे काही घडते त्यासाठी हा चित्रपट पाहावाच लागेल.

Sirf Ek Banda Kafi Hai Review
Sirf Ek Banda Kaafi Hai Trailer : आसाराम बापूला शेवटपर्यत नडला, जेलमध्येच धाडला!

मनोज वाजपेयीच्या अॅक्टिंगचे कौतूक करावे लागेल. त्यानं आपल्या भूमिकेनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. पी सी सोलंकीची भूमिका करणं हे त्याच्या आव्हानात्मक होतं. पण त्यानं ते आव्हान लीलया पेललं असून तो त्यात यशस्वीही झाल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे आसाराम बापूच्या भूमिकेत सुर्य मोहन कुलश्रेष्ठ यांनी केलेली भूमिका प्रभावी झाली आहे. हा चित्रपट पाहणे एक वेगळा अनुभव ठरु शकतो. गेल्या काही वर्षांपूर्वी पूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या त्या घटनेनं आसाराम बापूंच्या लाखो भक्तांना मोठा धक्का दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.