Sirf Ek Bandaa Kaafi Hai Fame Manoj Bajpayee reaction : अभिनेता मनोज वाजपेयीनं बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग बाबत धक्कादायक खुलासा केला असून तो चर्चेत आला आहे. बॉलीवूडमध्ये जे काही सुरु आहे त्याविषयीचे होतं ते सगळे सुशांतच्या आकलनापलीकडचे होते. अशी प्रतिक्रिया मनोजनं दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मनोजनं सांगितलं आहे की, सुशांतच्या आत्महत्येनं मला मोठा धक्का बसला होता. तो असे काही करेल असे वाटले नव्हते. सोनचिडीया नावाच्या चित्रपटाच्यावेळी त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री झाली होती.
आमच्यात चांगला संवादही होता. मी सेटवर नेहमीच मटन बनवायचो. आणि सुशांत त्यावर ताव मारायचा. मला खरचं वाटलं नव्हतं की, तो असे काही करेल. ते ऐकल्यानंतर मी खूपच अस्वस्थ झालो होतो. सुशांतला बॉलीवूडमधील राजकारण सहन झालं नाही.
Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!
सुशांत सिंग बाबत मोठी प्रतिक्रिया देताना मनोजनं म्हटले आहे की, बॉलीवूडमध्ये मोठं राजकारण आहे. त्याविषयी आपल्याला माहिती नाही. ते नेहमीच राहिले आहे. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्याविषयीचे राजकारण हे आणखीनच गंभीर होत जाते. हे मला दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत मी अधिकारवाणीनं सांगू शकतो.
मला कधीच या गोष्टींचा फरक पडलेला नाही. मात्र सुशांतला हा प्रेशर सहन करता आला नाही. त्यानं याबाबत माझ्याशी चर्चाही केली होती. मला असे वाटते त्या गोष्टींचा त्यावर परिणाम झाला होता.
मला नेपोटिझमचा काही फरक पडत नाही....
अभिनेता मनोजनं सुशांत सिंग आणि त्याच आत्महत्या यावर बिनधास्तपणे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तो चर्चेतही आला आहे. आता मनोजनं बॉलीवूडमधील नेपोटिझमवर देखील भाष्य केले आहे. जे त्याच्या चाहत्यांना आवडले आहे.
तुम्हाला जर मनोज वाजपेयी व्हायचे असल्यास तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी तर अशा गोष्टींचा अजिबातच विचार करत नाही. मला ते आवडतही नाही.
मी आतापर्यत मोठ्या कष्टानं माझे स्वप्न पूर्ण केले आहे. माझी वाटचाल मोठी आहे. त्यामुळे मला कुणाला फार महत्व देण्याची गरजही वाटत नाही. परखड बोलणं अनेकांना वाईट वाटेल पण त्यामागे गेल्या कित्येक वर्षांची मेहनत आहे. हे अनेकांना कळत नाही. ते सोयीनं विसरतात. हल्ली सगळ्यांना कौतूक हवे आहे. त्यांना कुणी त्यांच्याविषयी बदल सुचवले तर त्यांना ते माहिती नसते. यामुळेच की काय प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचे मनोजनं म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.