Disha Salian Death Case: SIT उघड करणार सुशांतच्या मॅनेजरच्या मृत्यूचे गूढ! राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश

Disha Salian Death Case
Disha Salian Death Case
Updated on

Disha Salian Death Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची आता एसआयटी चौकशी करणार आहे. राज्य सरकारने याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने पोलिसांना लेखी आदेश दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने आज (मंगळवार) एसआयटी (विशेष तपास पथक) तपासाचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सालियन यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत दिली होती.

दरम्यान दिशा सालियन प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली. उपायुक्त अजय बन्सल, मालवणीचे वरीष्ट पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Disha Salian Death Case
PM Modi On Congress: "काँग्रेस असेल तर मनी हाइस्ट फिक्शनची गरज कुणाला?"; पंतप्रधान मोदींनी साधला पुन्हा निशाणा

दिशा सालियनचा २०२० मध्ये निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा मृत्यू आतापर्यंत संशयास्पद मानला जात होता. उल्लेखनीय आहे की दिशा सालियन बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर देखील होती आणि अनेक लोक या दोन्ही मृत्यूंशी संबंध जोडण्याची भीती व्यक्त करत होते. राज्य सरकार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करत आहे. (Latest Marathi News)

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता त्यांनी एसआयटी तपासाबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याच्या सरकारवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "ते ज्यांना घाबरतात त्यांना बदनाम करण्याचे काम करतात. सरकार व्यवस्थेचा गैरवापर करत आहे. मी भाजपच्या मनात भीती बसवली आहे."

Disha Salian Death Case
भुजबळांकडे पेढे खायला अन् प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार; उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.