Smita Patil Birth Anniversary : 'ना गोरा गोमटा चेहरा, ना झिरो फिगर..'

कारकीर्दीच्या छोट्याश्या काळातही स्मिता पाटील यांनी संपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीवरती अधिराज्य गाजवलं.
Smita Patil
Smita Patil Sakal
Updated on

Smita Patil Birth Anniversary : नवाजउद्दीन सिद्दिकी हा आपल्या दर्जेदार अभिनयामुळे सध्या खूप जास्त चर्चेत असलेला अभिनेता आहे. त्याचे अगदी छोटे छोटे रोलही त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पण सुरुवातीच्या काळात त्याच्या रंगामुळे त्याला निराशा सहन करावी लागली होती. याबाबत बोलतांना तो म्हणाला की जर लोकांना स्मिता पाटील आवडू शकतात तर गोरे गोमटे चेहरे असावे अशी मागणी करणे चुकीचे आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

स्मिता पाटील या अतुलनीय सौंदर्यासाठी आणि दर्जेदार अभिनयासाठी खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री होत्या. आपल्या कारकिर्दीच्या छोट्याश्या काळातही त्यांनी संपूर्ण हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीवरती अधिराज्य गाजवलं.

तसा तर गव्हाळ रंग आणि बेसिक फीचर्स असलेला चेहरा असला तरी, तेव्हाच्या काळी अनेक लोकांच्या मनात स्मिता पाटील घर करून होत्या. एवढेच नव्हे तर, स्मिता पाटलांविषयी आजच्या तरूणांमध्येही वेड दिसून येत. बहुदा त्यांचे खूप नॅचरल फीचर्स आणि साधी राहणी यामुळे त्या खूप लवकर कोणाच्याही मनात घर करत होत्या.

काय म्हणाला नवाजउद्दीन सिद्दिकी?

नवाजउद्दीन सिद्दिकी याने दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, लोकांना गोरे गोमटे चेहरे आवडतात आणि त्यांना सावळे लोक नको असतात. ही समजूत चुकीची म्हणावी लागेल, कारण स्मिता पाटील या निकषांमध्ये कधीही बसल्या नाहीत आणि तरीही आजही त्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवता आहेत. त्यामुळे ही संकल्पना अतिशय खोटी आहे.

नक्की कोण होत्या स्मिता पाटील?

स्मिता पाटील ह्या पुण्यात वाढलेल्या एक अभिनेत्री होत्या. त्यांच्या अवघ्या 10 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी मराठी आणि बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात दूरदर्शनवरती न्यूज अँकर म्हणून केली होती.

त्यांच्या भूमिका आणि अम्मा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील देऊन गौरवण्यात आले होते. याशिवाय नमक हलाल, ​शक्ती, दर्द का रिश्ता, आखिर क्यों, ग़ुलामी, अमृत, नजराना,डांस-डांस हे चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

या सुप्रसिद्ध अभिनेत्याशी केलं होतं लग्न

स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्याशी लग्न केले होते. 80 च्या दशकात राज बब्बर स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. त्यांचे स्मितावर इतके प्रेम होते की, त्यांच लग्न झालेलं असलं तरीही ते दोघ सोबत राहत होते. राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगीसुद्धा होती. नंतर सगळ्यांचा विरोध पत्कारून दोघांनी लग्न केले. 1982 मध्ये 'भीगी पलकें' चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते.

असा झाला मृत्यू

स्मिता पाटील यांचा मृत्यू त्यांच्या प्रसूतीच्या वेळी आलेल्या कॉमप्लीकेशनमुळे झाला. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिल्यावर त्यांचा मृत्यू झाला होता. प्रसूतीनंतर त्यांची प्रकृती खूप खालावली होती. ज्यामुळे काही काळण्याआताच 15 दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.