Sofia Hayat: 'बिग बॉस'मुळे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आणि त्यानंतर अध्यात्माच्या मार्गावर मार्गस्थ झालेली सोफिया पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे. काही दिवस आधी तिनं काही धार्मिक विधींचे पालन केले होते,ज्यानंतर तिची शुद्ध हरपली होती. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आता पुन्हा तिची प्रकृती बिघडली आहे. जास्त वर्कआऊट केल्यामुळे तिला चेल्सी आणि वेस्टमिंस्टर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यासंदर्भात स्वतः सोफियानं अपडेट दिली आहे.(Sofia Hayat admittes in hospital after collapsing says need to forgive armaan kohli)
एका वेबसाईटशी साधलेल्या संवादा दरम्यान सोफिया हयात म्हणाली आहे,''मला चेल्सी अॅन्ड वेस्टमिंस्टर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. मी बेशुद्ध होऊन पडले होते. मी अजूनही ठीक नाही. माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या,पण मला असं वाटतं की मला हर्नियाचा त्रास आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मी यासंदर्भात हर्निया स्पेशालिस्टची भेट घेणार आहे. मी चिन स्टॅंड योगा केला होता आणि त्यावेळी छातीवर एकदम दबाव वाढल्याचं मला जाणवलं होतं. सध्या मी आराम करत आहे''.
सोफिया पुढे म्हणाली की,''मी आता सगळंच थांबवलं आहे,काहीच करत नाही. सगळ्याच गोष्टीत मी जरा सावधानता बाळगत आहे. माझ्याकडनं जास्त काम होऊ नये याची देखील मी काळजी घेत आहे. तिचं म्हणणं आहे की २० ते ४० वयोगटामधील सगळ्यांनी जास्त व्यायाम करणं चांगलं नसतं शरीरासाठी. सोशल मीडियावर जे व्हायरल होतं त्याकडे लक्ष न देता स्वतःची काळजी अधिक घ्यायला हवी. जेव्हा मी बेशुद्ध झाले तेव्हा मला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. मला असं वाटलं की ऑर्गन फेलियर झालं. इथे खूप चांगले वैद्यकीय कर्मचारी आहेत ज्यांनी मी शुद्धीवर येण्यासाठी खूप मेहनत घेतली''.
सोफिया हयात पुढे म्हणाली,''मला आता वाटतंय की मी काही लोकांना माफ करायला हवं. मला अरमान कोहलीला माफ करायला हवं. तसं मी याआधीच त्याला माफ केलं आहे. मला त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. मी माझा पहिला पती ,ज्यानं मला दुःख दिलं त्याला देखील माफ करते. कारण माफ करणं खूप गरजेचं असतं. खासकरुन तेव्हा,जेव्हा तुम्ही मृत्यूच्या दारात उभे असता,आणि तुम्हाला त्याचा आभास होत असतो''.
जून मध्ये देखील सोफियाची तब्येत खूप खराब झाली होती. तेव्हा देखील तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. अभिनेत्रीनं तेव्हा सांगितलं होतं की ती कडक उपवास करुन शरीराच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करत होती. तिला त्यावेळी जाणवलं की या प्रोसेस दरम्यान तिच्या शरीरातून अधिक प्रमाणात सॉल्ट आणि इलेक्ट्रोलाइट्स निघून गेले होते. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तेव्हा तिनं परिचारिकेला देखील सांगितलं होतं की,'मला ५ मिठाची पाकिटं आणून दे...' म्हणजे इतकी वाईट अवस्था तिची होती त्यावेळी. पण त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.