अभिनेत्रींच वाढलेलं वजन हा नेहमीच त्यांच्यासाठी शाप ठरत आला आहे. मग अगदी नावं ठेवणाऱ्यांना वाटतं की हिरोईन झालं की त्यांचं वजन प्रत्यक्ष आयुष्यात गरोदर राहिलं तरी वाढू नये. आणि मग काही ना कही कारणानं वजन वाढल्यानं शरीराचा आकार बदलला की मग ट्रोलर्स सुरू होतात अशा अभिनेत्रींना ट्रोल करायला. गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंग वरनं ट्रोल केलं गेल्याचं दिसून आलं. या वाढलेल्या वजनावरनं सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीला देखील ट्रोल केलं गेलं होतं. आणि म्हणूनच दोघींनीही याच विषयावर आधारित सिनेमा साइन केला आहे. ज्याचं नाव Double XL आहे. सोनाक्षी सिन्हानं(Sonakshi Sinha) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिनेमाबरोबरच बॉडी शेमिंगवर(Body Shaming) देखील भाष्य केलं आहे.
सोनाक्षी सिन्हानं एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,''जेव्हा या सिनेमाची स्क्रीप्ट आमच्या दोघींकडे आली तेव्हा त्या कथेनं आमच्या थेट मनालाच स्पर्श केला. मी या सिनेमाला हुमाशिवाय कुणा इतर अभिनेत्रीसोबत करूच शकले नसते. हा सिनेमा आमच्या दोघींसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आम्ही दोघींनाही वाढलेल्या वजनावरुन लोकांची टीका सहन केली आहे. करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत हे माझ्यासोबत होत आहे. अजूनही संपलेलं नाही''.
सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली,''तुमच्या शरीराचा आकार कसाही असो,लोकं बोलणारच. आता मी या अशा टीकांना फार महत्त्व देत नाही. आपण म्हणतो की हे कलयुग आहे,पुढारलेल्या-मॉर्डन युगाचा आपण भाग आहोत. आपण रंग,लिंग,जात-धर्म यावरनं भेदभाव करायला नको. पण मग यामध्ये शरीराचं वजन आणि आकार यांचा पण आता समावेश करायला हवा. त्यांचा समावेश त्यात का करायचा नाही? वजन आणि शरीराचा आकार यावरनं कशाला भेदभाव करायला हवा. अशा पद्धतीचा सिनेमा करणं गरजेच होतं. कारण हा सिनेमा दोन अशा महिलांवर भाष्य करतो ज्या खूप हुशार आहेत आणि आपल्या मनाचं त्या ऐकतात,स्वतःला जसं जगावसं वाटतं तसं जगतात. हो पण प्रश्न आहे की,जर कोणी स्त्री अशा पद्धतीनं जगायला लागली तर कितीजणांना ते पटेल?''
सोनाक्षी सिन्हानं 'Double XL' सिनेमाच्या हटके कथानकाची कल्पना कुठून सुचली याविषयी देखील त्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली,''या सिनेमाच्या कथानकाचं कनेक्शन लॉकडाऊनशी आहे. या सिनेमासाठी मी आणि हुमानं खूप वजन वाढवलं आहे,कारण आम्हाला भूमिकेत फीट बसायचं होतं. मी आणि हुमा खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. एकदा आम्ही आरामात एके ठिकाणी बसलो होतो. मुदस्सर अजीझनं आम्हाला पाहिलं आणि म्हणाला,'तुम्हाला दोघींना मिळून एक सिनेमा करायला हवा'. आणि खरंच हे घडतंय. मी आणि हुमानं सिनेमासाठी तेव्हा तयारी सुरु केली होती जेव्हा आम्ही थोडे स्लिम होतो. पण सिनेमातील भूमिकेत फिट बसावं म्हणून आम्ही वजन वाढवलं आहे. हुमा आणि मी दोघींना खूप वेगवेगळ्या डिश ट्राय करायला आवडतं. थोडक्यात आम्ही फूडी आहोत. त्यामुळे सिनेमाची ही जर्नी आम्ही एन्जॉय केली आहे''.
''ही भूमिका साकारताना तिला संपूर्णतः समजून घेणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात अशी एखादी व्यक्ती,जी वाढलेल्या वजनाचा त्रास सहन करतेय ती कसा विचार करते इथवर विचार करणं आम्हा दोघींसाठी महत्त्वाचं होतं. हो, पण तेवढंच आवश्यक होतं सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर पुन्हा आमच्या स्वतःच्या नॉर्मल रुटीन लाइफमध्ये येणं. आणि पुन्हा हेल्दी लाइफस्टाइलही जगणं आवश्यकच आहे आमच्यासाठी''. Double XL सिनेमात सोनाक्षी आणि हुमा कुरेशी व्यतिरिक्त जहीर इकबाल सुद्धा महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाला सतराम रमानीनं दिग्दर्शित केलं आहे,आणि मुदस्सर अजीझनं हा सिनेमा लिहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.