Mogalmardini Chatrapati Tararani Teaser: अनेक दिवसांपासून सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाची उत्सुकता होती.
अखेर सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. अंगांवर रोमांच उभा करणारा मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाचा टिझर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.
(sonalee kulkarni Mogalmardini Chatrapati Tararani Teaser out now)
टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे.
मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे.
अनेक दिवसांपासून सोनाली कुलकर्णीच्या मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाची उत्सुकता होती. अखेर सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाचा टिझर रिलीज झालाय.
अंगांवर रोमांच उभा करणारा मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाचा टिझर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.
टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे.
मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे.
स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय.
ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली.
बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक मुलगी, सून, पत्नी, माता अशा विविध भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे,
या उद्देशाने दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.
नुकतेच सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत.
या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. हा ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.