Sonalee Kulkarni shared video about new theatre opening in nigadi pune ga di madgulkar natya gruha
Sonalee Kulkarni shared video about new theatre opening in nigadi pune ga di madgulkar natya gruhasakal

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीनं पुणेकरांना दिली गुड न्यूज.. व्हिडिओ शेयर करत म्हणाली..

सोनालीने शेयर केलेला हा व्हिडिओ होतोय व्हायरल..
Published on

Sonalee Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. गेली काही दिवस ती सातत्याने चर्चेत आहे. मग तिचे लग्न असो, हनीमून असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी. ती कायमच चाहत्यांशी जोडली गेलेली असते.

मध्यंतरी तिचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट येऊन गेला, तर लवकरच ती 'महाराणी ताराराणी' यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा अनेक फोटो, व्हिडिओ शेयर करत असते.

आज मात्र या महाराष्ट्राच्या अप्सराने एक खास घोषणा केली आहे. खरतर ही पुणेकरांची मोठी आनंदाची बातमी आहे. पण सबंध मनोरंजन विश्वासाठीच ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सोनालीने शेयर केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(Sonalee Kulkarni shared video about new theatre opening in nigadi pune ga di madgulkar natya gruha)

Sonalee Kulkarni shared video about new theatre opening in nigadi pune ga di madgulkar natya gruha
Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट संपला आणि थिएटर मध्ये जे काही झालं ते पाहून..

सोनालीने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती अत्यंत पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे. यावेळी ती या आलीशान रंगमंचावर उभी आहे. एखाद्या भव्य दिव्य ओपेरा हाऊस सारखी रचना असलेले हे सभागृह सोनालीच्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

सुरवातीला सोनाली परदेशी आहे का किंवा कुठे बाहेरच्या देशातील थिएटर मधून आपल्याची बोलतेय का असा भास होतो. पण हे कोणतंही परदेशातल नाट्यगृह नसून सोनाली चक्क पुण्यातील निगडी येथील एका नाट्यगृहात उभी आहे. सोबतच या नाट्यगृहाची खासियत सांगितली आहे.

पुण्यातील निगडी मध्ये ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने एक भव्य दिव्य अत्याधुनिक आलीशान असे नाट्यगृह निगडी प्राधिकरणाने उभारले आहे. लवकरच हे नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुले होणार असून दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद आणि सुसज्ज नाट्यगृह पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

सोनाली स्वतः निगडीची असल्याने तिने अत्यंत आपुलकीने तिने हा व्हिडिओ शेयर केला आहे. सोबतच कशा पद्धतीने अवधूत गुप्ते, महेश काळे, प्रशांत दामले या दिग्गजांनी या नाट्य गृहाच्या उभारणीत मार्गदर्शन केले, याबद्दल सांगितले आहे.

विशेष म्हणजे या नाट्यगृहात कलाकारांच्या राहण्याची आणि उत्तम जेवणाची सोय देखील असणार आहे. त्यामुळे हे नाट्यगृह कलाकारांसाठीही एक पर्वणी असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.