'अशिक्षित, अज्ञानी'; सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम, रिचाची पोस्ट व्हायरल

वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
Sonam Kapoor, Sudhir Mungantiwar, Richa Chadha
Sonam Kapoor, Sudhir Mungantiwar, Richa Chadha
Updated on

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०२१ अधिनियमातील सुधारणांना विरोध दर्शवताना LGBTQIA समुदायातील सदस्यांबाबत काही वक्तव्यं केली. यावरून सध्या त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होताना दिसतेय. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि रिचा चड्ढा (Richa Chadha) यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. सोनमनं मुनगंटीवार यांना अशिक्षित, निरक्षर असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मविआ सरकारनं मंजूर केलेल्या सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम विधेयक २०२१ मधील एका तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठाला समान संधी मंडळ स्थापन करावं लागेल. या मंडळाच्या माध्यमातून दुर्बल, महिला, लैंगिक अल्पसंख्याक (LGBTQIA), विकलांग यांना समान संधी आणि सुरक्षा मिळेल. याला विरोध करताना मुनगंटीवार म्हणाले, 'समलैंगिकांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का?' हे विधेयक आहे. अजून अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण?' त्यांचा हाच व्हिडीओ शेअर करत सोनम आणि रिचाने संताप व्यक्त केला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केलं.

'अशिक्षित, दुर्लक्षित आणि द्वेषपूर्ण' असं सोनमने म्हटलंय. तर रिचानेही सणसणीत टोला लगावला आहे. 'असभ्य, अज्ञानी. इतर अनेक गोष्टींप्रमाणेच आपल्या नेत्यांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे', असं रिचाने ट्विटरवर लिहिलं आहे.

'समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त करणार आहात का? थोडं तरी गांभीर्य ठेवा. याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती बसवायची नाही का? यामध्ये उभयलिंगी आणि अलैंगिक संबंधाचा उल्लेख केला आहे. पण, त्याची परिभाषा अजून कोणी सांगितली नाही. अलैंगिक संबंध म्हणजे जनावरासोबत ठेवलेले संबंध. ते जनावर तुम्हाला तुम्ही अलैंगिक असण्याचं प्रमाणपत्र देणार आहे का,' असं वादग्रस्त वक्तव्य मुनगंटीवारांनी यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.