'अजान' नंतर आता 'नवरात्री' वर सोनू निगमचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला...

सोनू निगमचा नवरात्री संदर्भात भाष्य करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला जोरादार विरोध केला जात आहे.
Sonu Nigam
Sonu NigamGoogle
Updated on

बॉलीवूडचा(Bollywood) प्रसिद्ध गायक(Singer) सोनू निगम(Sonu Nigam) पुन्हा एकदा एका नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सोनू निगमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ क्लीपमध्ये सोनू निगमनं नवरात्रीला मटण बंदी कशाला? असं वक्तव्य केलं आहे,ज्यामुळे वाद छेडण्याची चिन्ह दिसत आहेत. व्हिडीओत सोनू निगम बोलताना दिसत आहे की,''नुसतं जय श्रीराम मुखानं बोललो म्हणजे मी त्याचा निस्सिम भक्त झालो असं होत नाही''. एवढंच नाही,तर सोनू निगमने नवरात्रीला(Navratri) मटण खाणं कशाला बंद करायचं असं देखील त्या व्हिडीओत म्हटलं आहे. एक माणूस मटण विकत आहे,त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे,तो त्याचं काम करतोय मग उगाचच तुम्ही त्याचं मटणाचं दुकान का बंद करताय?

Sonu Nigam
'जमिनीवर झोपून लादी पुसतेयस?',भर कार्यक्रमात बादशहानं उडवली नोराची खिल्ली

सोनू निगमचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला जोरदार विरोध करायला सुरुवात झाली. कोणी त्याला नवरात्रीला मटण बंदी करु नका या म्हणण्यावर धारेवर धरताना दिसला तर कुणी श्रीराम संदर्भातल्या त्याच्या वक्तव्यावर त्याला सुनावताना दिसला. अर्थात यामध्ये सोनूचे चाहतेही होतेच,ज्यांनी त्याच्या बाजूनं बोलणं योग्य समजलं. असं पहिल्यांदाच होत नाही काही जेव्हा सोनू निगमने असं काहीतरी वादग्रस्त विधान दिलं आहे. पण प्रकरण अंगावर शेकतंय हे कळल्यावर त्यानं अनेकदा आपली स्टेटमेंट्स बदलली देखील आहेत. हे त्याची काही जुनी वादग्रस्त वक्तव्य वाचली की कळेलच तुम्हाला.

Sonu Nigam
'रानबाजार' नंतर प्राजक्ता माळीचा 'तो' फोटो ठरतोय हॉट न्यूज...

२०१७ मध्ये सोनूने आपल्या ट्वीटच्या माध्यमातून मशिदीवरील भोंग्यातून मोठ्यानं ऐकू येणाऱ्या अजानचा विरोध केला होता. सोनू निगमच्या त्या ट्वीटवरनं खूप गोंधळही माजला होता. वादात ओढले गेलोय आणि ते महाग पडणार हे लक्षात आल्यावर सोनूनं एक पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं लोकांसमोर मांडलं होतं. त्यानं म्हटलं होतं की,'' मी फक्त एका सामाजिक विषयावर माझं मत मांडलं आहे. कोणत्याही धर्माचा मी विरोध केलेला नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. हे अजान संदर्भात नाही तर भोंग्याच्या माध्यमातून होणाऱ्या आवाजाच्या तीव्रतेसंदर्भात होतं''. त्यावेळी तो म्हणाला होता,''मी मंदिर आणि गुरुद्वारासंदर्भातही हेच बोललो होतो. पण याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही''.

Sonu Nigam
Video: 'वाराणशीला आलो हे माझं दुर्देव'; अभिनेता अर्जुन रामपालची जीभ घसरली

'अजान','नवरात्री','जय श्रीराम' व्यतिरिक्त सोनू निगमनं 'राधे मॉं' वरनं देखील अनेक प्रश्न छेडले होते. त्यानं आपल्या वक्तव्यात राधे मॉं ची तुलना काली मातेशी देखील केली होती. म्हणाला होता, ''काली माता देखील छोटे कपडे घालायची,पण त्यांच्यावर कधी कोणी प्रश्न नाही निर्माण केले''. त्यावेळी सोनू निगमच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा खूप तीव्र विरोध करण्यात आला होता.

Sonu Nigam
'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत शैलेश लोढा,शूटिंगही थांबवलय

या सगळ्या वादांव्यतिरिक्त सोनू निगमनं आपण पाकिस्तानी गायक असतो तर अधिक चांगलं झालं असतं असं देखील म्हटलं होतं. भारतीय गायकांना जर बाहेर जाऊन गायचं असेल तर त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. पण जेव्हा पाकिस्तानी गायक इकडे येतात तेव्हा त्यांच्याकडून कुणीच पैसे घेत नाही. ज्या सोनू निगमला अजानच्या आवनाजानं त्रास व्हायचा त्यानंच एकदा बाबरी मशीद पाडणं चुकीचं म्हटलं होतं. गायकाचं म्हणणं होतं की बाबरनं मंदीर तोडून चुकीची गोष्ट केली होती. पण आता इतक्या वर्षांनतर मशीद तोडणं हे देखील चुकीचंच आहे. अशा अनेक वादग्रस्त वक्व्यांनी सोनू वादात पडला होता. आता या नवीन नवरात्री संदर्भातल्या वक्व्यानं सोनूला काय भोगावं लागेल हे वेळच सांगेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.