Sonu Sood Birthday: सोनू सुदला फॅन्सकडून मिळणार बर्थडेची ट्रीट! वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन

सोनूच्या वाढदिवशी यापेक्षा चांगली भेट दुसरी कोणतीच असू शकत नाही. असं त्याच्या चाहत्यांना वाटतं.
 Sonu Sood
Sonu SoodEsakal
Updated on

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद हा त्याच्या चित्रपटांमुळे कमी तर त्याच्या निस्वार्थ सेवेसाठी ओळखला जातो. सोनू सूद आज लोकांसाठी मसिहा झाला आहे. कोरोनाच्या काळातच सोनुने लोकांची केलेली मदत ही न विसरता येणारी आहे.

तेव्हाच नव्हे तर आजही सोनू सर्वाच्या मदतीला धावतो. त्याचे चाहते तर त्याला देवापेक्षा कमी मानत नाही. आज म्हणजेच त्याच्या 30 जुलैला सोनू सूदचा वाढदिवस आहे.

 Sonu Sood
Kangana Ranaut: '250 कोटी खर्च करुन 'डेली सोप' बनवला..','रॉकी और रानी की प्रेम कहानी' पाहिल्यानंतर कंगनानं करण जोहरची काढली लाज

चित्रपटात हिरो बनला नसला तरी खऱ्या आयुष्यात तो गरिबांचा खरा हिरो आहे. कोरोनापासून सोनू सूदने देश आणि समाजसेवेसाठी काम केलं आहे.

विशेषत: कोविड-19 मध्ये त्याने अनेकांना मदतीचा हात दिला आपुलकीने लोकांना केलेल्या मदतीने त्याने लाखो लोकांच्या हृदयात विशेष स्थान मिळाले आहे.

त्याच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याच्या चाहत्यांनीही त्याच्यासाठी खुप खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ना मोठी पार्टी, डिजे ना कोणत्याही प्रकाराचा देखावा न करता सोनूचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

 Sonu Sood
Akanksha Dubey death case: 'माझ्या लेकीला जाऊन चार महिने झाले मात्र..' आकांक्षा दुबेची आई अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत..

गरजूंना मदत करण्याच्या सोनू सूदच्या विचांरानी प्रेरित होऊन त्याच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन केलं आहे.

देशभरात तब्बल 800 ते 900 रक्त शिबिरे उभारण्यात आली आहेत. रक्तदान मोहिमेव्यतिरिक्त वंचितांना अन्न दान देखील चाहते करणार आहेत.

सोनूच्या वाढदिवशी यापेक्षा चांगली भेट दुसरी कोणतीच असू शकत नाही. असं त्याच्या चाहत्यांना वाटतं.

 Sonu Sood
Puneet Superstar: बिग बॉस मधुन हाकललं, आता पुनित सुपरस्टार दिसणार या प्रसिद्ध रिअॅलिटी शो मध्ये

कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्याने गरिबांना मदत केली. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना घरी नेण्यापासून ते औषधं पुरवण्यापर्यंत इतकच नाही तर ऑक्सिजन सिलिंडर, लसी अशी अनेक शक्य तितकी मदत त्याने केली.

आता सोनू यूपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांना आणि 'संकल्प'च्या माध्यमातुन LAW चं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे. 

सोनूकडे कोणीही मदत मागण्यासाठी जाऊ शकतो. तो त्यांची मदत करतो. त्याने आपल्या सर्व कमाई लोकांसाठी खर्च केली होती. त्यामुळेच त्याला रियल हिरो आणि मसिहा म्हटलं जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.