Sonu Sood: सोनू सूदच्या SCF "संभवम" चा आर्थिकदृष्ट्या वंचितांसाठी आणखी एक कौतुकास्पद उपक्रम..

Sonu Sood Free IAS Coaching
Sonu Sood Free IAS Coaching
Updated on

Sonu Sood Free IAS Coaching: बॉलीवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या कामासाठी तसेच त्याच्या अभिनयासाठीच नव्हे तर समाजकार्यासाठीही ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत या अभिनेत्याने असे केले आहे, जे आजपर्यंत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याने केले नाही.

Sonu Sood Free IAS Coaching
Kangana Emergency: या तारखेला पुन्हा लागणार 'आणीबाणी', कंगनाच्या सिनेमाची रिलीज डेट समोर

सोनू सूद महामारीच्या काळात लोकांसाठी मसिहा म्हणून उदयास आला. त्यांनी मनापासून सर्वांना मदत केली. लोकांसाठी रात्रंदिवस काम केले.

सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) चा संस्थापक म्हणून सोनू सूद ने कायम समाजासाठी अनेकांची मदत केली. समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि नवीन बदल घडवून आणण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केलं आहे.

Sonu Sood Free IAS Coaching
PM Modi in US: 'टेलीप्रॉम्प्टर वापरल्यानंतरही चुकीचं इंग्रजी बोलणं', अभिनेत्यांने उडवली मोदींची खिल्ली..

शिक्षण , आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि आपत्ती निवारणावर या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करून SCF च्या माध्यमातून सोनूने लोकांची मदत करत आहे.

सूद चॅरिटी फाऊंडेशनने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) आणि सरत चंद्र अकादमी यांच्या सहकार्याने 2023-24 या वर्षासाठी 'संभवम' सुरू करण्याची घोषणा सोनू ने केली आहे.

हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या सगळ्या तरुणाईला समर्पित असणार आहे ज्यांना नागरी सेवा परीक्षा चे विनामूल्य ऑनलाइन IAS कोचिंग, मार्गदर्शन मिळणार आहे.

Sonu Sood Free IAS Coaching
Sakshi Chopra: 'रामायण'कार रामानंद सागर यांच्या नातीने नेटफ्लिक्सवरील शोच्या निर्मात्यांवर लावले लैंगिक अत्याचाराचे आरोप...

सोनू च्या या अनोख्या उपक्रमाने अनेक तरुण IAS अधिकारी घडणार आहेत. समाजातल्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींसाठी नव्या संधी निर्माण करणे हेच या SAMBHAVAM चे उद्दिष्ट आहे.

सोनू च्या या अनोख्या कार्याने जगभरात अनेक तरुण IAS अधिकारी घडणार आहेत. SAMBHAVAM चे उद्दिष्ट हेच आहे की समाजातल्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींसाठी नव्या संधी निर्माण करणे आहे. DIYA आणि सरत चंद्र अकादमीसोबत भागीदारी करून, SCF एक चांगला आणि मजबूत भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.