घर आणि पुस्तकं गेली पूरात वाहून, सोनू सूद म्हणाला 'ताई अश्रू पूस..'

sonu sood
sonu sood
Updated on

मुंबई- अभिनेता सोनू सूदने गेल्या तीन महिन्यांपासून गरजुंसाठी मदतकार्य सुरु केलं होतं ज्यात अजुनही खंड पडलेला नाही. उलट पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्याचं काम वाढलंय. सोनू जो पहिले केवळ प्रवाशांची मदत करत होता तो आता परदेशात अडकलेल्या लोकांपर्यंत देखील त्याची मदत पोहोचवत आहे. तसंच देशात पूरामुळे त्रस्त झालेल्या लोकांचीही परिस्थिती जाणून घेत आहेत. यातंच आता सोनूने एका आदिवासी मुलीला धीर दिला आहे.

सोशल मिडियावर एका मुलीचा व्हिडिओ शेअर करत सोनूने सांगितलं की 'पूरामुळे यांचं घर उद्धवस्त झालं. पुस्तकं देखील भिजली.' व्हिडिओमध्ये दिसून येतंय की  भिजलेली पुस्तकं पाहून ती मुलगी ढसाढसा रडत आहे. आता हा व्हिडिओ पाहून सोनू सूद भावूक झाला आहे. त्याने नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या मुलीसाठी ट्विट केलं आहे. 'ताई अश्रू पूस कारण पुस्तकं नवीन मिळतील आणि घरही.'

सोनू सूदचं हे ट्वीट व्हायरल होत आहे. त्याने पुन्हा एकदा कठीण काळात कोणाच्या तरी आयुष्यात चांगले दिवस आणले आहेत.याआधीही सोनू सूदने अनेकवेळा अशी कामं करुन चाहत्यांचं मन जिंकलं आहे. आसाम आणि बिहारमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोनूने मोठं अभियान सुरु केलं आहे. त्याने रोजगार मिळवून देण्यासाठी नवीन मोहीम सुरु केली आहे.

याव्यतिरिक्त शेतक-यांना घरात देखील आनंद पसरवला आहे. कोणाला ट्रॅक्टर तर कोणाला बैल भेट देऊन त्याने त्या गरिब शेतक-यांचं काम सोपं केलं आहे. सोनूने त्याच्या कामातून लहान मुलांचंही मन जिंकलं आहे. अशा कित्येक पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यात कोणी सोनूला हिरो म्हणतंय तर कोणी त्याच्या कामाने प्रभावित होऊन त्याच्यासारखं बनण्याची स्वप्न पाहतंय.     

sonu sood help girl provide new book house flood  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.