सोनू सूदनं(Sonu Sood) कोरोना(Corona) काळात अनेक गोरगरीब मजूरांना वेगवेगळ्या मार्गानं मदतीचा हात दिला होता. त्याची स्वतःची एक संस्था देखील आहे, ज्याच्या माध्यमातून तो लोकांना नेहमीच मदत करत असतो. पण गरजवंतांची मदद करण्यासाठी सोनू सूदनं जो मार्ग अवलंबला आहे त्याबद्दल जर आपल्याला कळेल तर अभिनेत्याची प्रशंसा केल्याशिवाय आपण नक्कीच राहणार नाही. सोनू सूदनं एका हॉस्पिटलची जाहिरात करण्याच्या मोबदल्यात यकृत प्रत्यारोपणासाठी १२ करोड रुपयांचा फंड घेतला आहे.
सोनू सूदनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. त्याचवेळी त्यानं सांगितलं की याआधी त्यानं जेवढ्या जाहिराती केल्या आहेत त्यातून जो पैसा आला,तो त्यानं गरिबांच्या मदतीसाठी म्हणजेच चॅरिटीमध्येच वापरला आहे. सोनू सूद म्हणाला,''कधी-कधी मी केलेल्या जाहिरातीच्या मोबदल्यात मला द्यायचा पैसा जाहिरात करणारी कपंनी थेट शाळेला किंवा हॉस्पिटलला देतात किंवा कधी-कधी तो पैसा आमच्या चॅरिटीच्या माध्यमातूनही गरजवंतांना दिला जातो. आम्ही जिथे मदत हवी असते त्यासाठी काहीही करायला तयार आहोत''.
सोनू सूदनं याच मुलाखतीत एकदा त्यानं एका हॉस्पिटलला कसं गरजूंची मदत करण्यासाठी तयार केलं होतं याचा एक अनुभव शेअर केला आहे. सोनू सूद म्हणाला,''एका हॉस्पिटलला माझ्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात काम करायचं होतं. मी त्यांना म्हणालो,मी तुमच्या हॉस्पिटलचं प्रमोशन करेन. पण तुम्हाला त्याबदल्यात ५० यकृत प्रत्यारोपण करावे लागतील. ज्याचा खर्च १२ करोड रुपयांपर्यंत असेल. आता सध्या दोन अशा लोकांचं यकृत प्रत्यारोपण सुरु आहे,जे आयुष्यात कदाचित हा खर्च कधीच पेलू शकले नसते. मला वाटतं जेव्हा लोक तुमच्याकडे येतात आणि विचारतात की आम्ही तुमची मदत कशी करू शकतो तेव्हा मग थोडा विचार केला की मार्ग आपोआप मिळतो''.
सोनू सूद कोरोना काळात ना केवळ मजूरांना त्यांच्या घरी पाठवलं होतं,तर अडचणीत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी औषध,ऑक्सिजन सिलेंडर आणि हॉस्पिटल पासून अनेक गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला. सोनू सूद ने गेल्या २-३ वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी जे केलं आहे,त्यामुळे त्या जनतेच्या नजरेत तो खरा हिरो बनला आहे.
सोनू सूदच्या नवीन प्रोजेक्ट्सविषयी बोलायचं झालं तर 'पृथ्वीराज' सिनेमातून तो आपल्याला दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार,संजय दत्त,मानुषी छिल्लर महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. हा सिनेमा ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त सोनू सूद 'फतेह' आणि तामिळ सिनेमातही आपल्याला दिसणार आहे. सध्या सोनू सूद 'रोडीज शो' ला होस्ट करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.