Sonu Sood: सोनू चा अनोखा उपक्रम ! आईच्या स्मरणार्थ सुरू केली खास शिष्यवृत्ती !

Sonu Sood
Sonu Sood Esakal
Updated on

Professor Saroj Sood Scholarship 2023: साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सोनू सूद आज लोकांसाठी मसिहा बनला आहे.

सोनू सूद हा एक अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकप्रिय आहे. सोनूने आजवर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

सोनू सूदने कोरोनाच्या काळात मदत करणाऱ्या स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली.  लोकांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतो.

बेघरांना आश्रय देणारा , गरजूंसाठी एअरलिफ्टचे आयोजन करणारा सामान्य माणसाच्या सेवेसाठी कायम तत्पर असलेला असा अभिनेता म्हणुन सोनूनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या या अनोख्या कामामुळे तो नेहमीच चाहत्यांच्या मनावर एक अमिट छाप सोडून जातो.

2022 मधल्या अनोख्या यशा नंतर " प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 नुकतीच लाँच करण्यात आली.

" सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) अंतर्गत प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 ही खास शिष्यवृत्ती पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे.

ही खास शिष्यवृत्ती अभिनेता सोनू सूदची यांची आई सरोज सूद यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आली आहे.

Sonu Sood
Adipurush Box Office Collection: सडकून टीका.. तरीही दणकून कमाई! आकडा पाहून डोळे फिरतील..

' प्रो. सरोज सुद शिष्यवृत्ती 2023' ही खास शिष्यवृत्ती मोहीम पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींद्वारे दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. सोनू सूद चॅरिटी फाउंडेशन त्यांच्या उच्च शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा अनोखा हात आहे.

Sonu Sood
Adipurush: हे तर रामायणाचे विडंबन, आदिपुरुष विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

पदवीपूर्व आणि पदव्युत्तर या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करून आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. सोनू सूदने “पढाई आपकी, झिम्मेदारी हमारी” या अनोख्या विचार शैली ने ही अनोखी मोहीम सुरू केली आहे.

Sonu Sood
Sunny Deol: मे निकला गड्डी लेके, मुलाच्या संगीत सेरेमनीमध्ये सनी बनला तारा सिंग, व्हिडिओ व्हायरल

सूद चॅरिटी फाउंडेशन (SCF) ने देश भगत युनिव्हर्सिटी आणि बुधा कॉलेजसोबत भागीदारी स्थापित केली आहे ज्यामध्ये ते पात्र उमेदवारांसाठी विविध शिष्यवृत्तीच्या जागा देतात.

अर्जदारांनी त्यांच्या अटी व शर्तींनुसार विद्यापीठाने निश्चित केलेले निवड निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. 'प्रा. सरोज सूद शिष्यवृत्ती 2023' साठी अर्ज एससीएफच्या अधिकृत वेबसाइटवर फॉर्म भरून सबमिट करू शकतात. https://soodcharityfoundation.org/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()