सोनु सुदनं सांगितली झाडु मारण्याची नवी ट्रीक, सफाई कामगार चक्रावले

बॉलीवूडचा bollywood प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद sonu sood त्याच्या सामाजिक कामांसाठी ओळखला जातो.
सोनु सुदनं सांगितली झाडु मारण्याची नवी ट्रीक, सफाई कामगार चक्रावले
Updated on

मुंबई - बॉलीवूडचा bollywood प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद sonu sood त्याच्या सामाजिक कामांसाठी ओळखला जातो. तो केवळ त्याचा अभिनयासाठी ओळखला जात नाही तर त्यानं आजवर केलेल्या सामाजिक कामांची यादीही मोठी आहे. विशेषत सोनुनं कोरोनाच्या काळात अनेकांना आधार दिला. कोरोनाग्रस्तांसाठी आरोग्याच्या सुविधाही त्यानं दिल्या. अजुनही देतो आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी जेव्हा ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हाही सोनुनं पुढाकार घेऊन तो प्रश्न मार्गी लावला होता. आता सोनु चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे त्याचा साफ सफाई करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

सोनु सोशल मीडियावर social media अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहे. तो कधी रस्त्यावर काही विकताना दिसतो, तर कधी फुटपाथवरुन चालताना कुणाशी बोलतानाही दिसतो. चाहत्यांना यासगळ्या गोष्टींचे आश्चर्य वाटते. मात्र तो त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूसही करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो एका शहरात रिक्षा चालवतानाही दिसला होता. आता सोनुचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं झाडू मारण्याची एक नवी टेक्निक दाखवून दिली आहे.

सोनुनं आपल्या इंस्टावरुन तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला काही वेळांतच हजारो व्ह्युज आले आहे. सोनुची लोकप्रियता मोठी असल्यानं त्याच्या पोस्टला येणारा प्रतिसाद मोठा असतो. सोनुनं सफाई कर्मचाऱ्यांना झा़डू मारण्याची नवी ट्रीक शिकवली आहे. त्यात तो सांगतो, ज्यापद्धतीनं तुम्ही झाडू मारता त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागतो. अशारीतीनं तुमचं काम लवकर होणार नाही. त्यानं आपल्या त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Once an Engineer always an Engineer. Learning new lessons'. फॅन्सला त्याचा हा व्हिडिओ आवडला असून त्याला आतापर्यत 1 मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज आले आहेत.

सोनु सुदनं सांगितली झाडु मारण्याची नवी ट्रीक, सफाई कामगार चक्रावले
आता ऐका 'सकाळ'च्या बातम्या... आजचं Podcast जरुर ऐका
सोनु सुदनं सांगितली झाडु मारण्याची नवी ट्रीक, सफाई कामगार चक्रावले
जेहच्या नावावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना करीनाचं सडेतोड उत्तर

1991 मध्ये सोनुनं आपल्या करिअरला सुरुवात केली. तो भलेही चित्रपटांमध्ये व्हिलनच्या भुमिकेत दिसत असेल मात्र त्याच्या वेगवेगळ्या सामाजिक कामानं त्यानं अनेकांना आधार दिला. गरीबांचा मसीहा अशीही त्याची ओळख आहे. त्याच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात कालाझआगर चित्रपटापासून झाली. तर 2002 मध्ये त्यानं शहीद ए आझममधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.