Chiranjeevi Blood Bank Case: चिरंजीवी ब्लड बॅंक प्रकरणात साऊथ अभिनेता राजशेखर आणि बायकोला अटक

मेगास्टार चिरंजीवीद्वारे चालवल्या जाणाऱ्या या रक्तपेढीवर खळबळजनक आरोप केले होते
South actor Rajasekhar and his wife jeevitha arrested in Chiranjeevi blood bank case
South actor Rajasekhar and his wife jeevitha arrested in Chiranjeevi blood bank caseSAKAL
Updated on

Chiranjeevi Blood Bank Case Update News: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

चिरंजीवी ब्लड बँकेशी संबंधित बदनामीच्या एका जुन्या प्रकरणात साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राजशेखर आणि त्यांची पत्नी जीवीथा यांना न्यायालयाच्या निकालाला सामोरं जावं लागलं आहे.

17 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी) यांनी राजशेखर आणि जीवीथा या जोडप्याला एक वर्ष तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंड ठोठावला आहे.

(South actor Rajasekhar and his wife jeevitha arrested in Chiranjeevi blood bank case)

South actor Rajasekhar and his wife jeevitha arrested in Chiranjeevi blood bank case
Sonalee Kulkarni Garva Dance: गारवाला २५ वर्ष! सोनाली कुलकर्णी - फुलवाचा भर पावसातला गारवा डान्स बघाच

चिरंजीवीच्या रक्तपेढीवर आरोप

चिरंजीवी रक्तपेढीच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत केली जाते. 2011 मध्ये, साऊथ सिने अभिनेते राजशेखर आणि त्यांची बायको जीवीथा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून

मेगास्टार चिरंजीवीद्वारे चालवल्या जाणाऱ्या या रक्तपेढीवर खळबळजनक आरोप केले होते. रक्तपेढीतून जमा झालेले रक्त बाजारात विकले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

आरोपांवर प्रति- आरोप

या आरोपाविरोधात चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांनी खटला दाखल करून न्यायालयात धाव घेतली होती. राजशेखर आणि त्यांची पत्नी जीवीथा यांच्या या गोष्टींवर नाराजी व्यक्त करत त्यांनी चिरंजीवी यांच्या रक्तपेढीवर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते.

या रक्तपेढीवर या दाम्पत्याने माध्यमांमध्ये केलेले आरोप सीडी स्वरूपात न्यायालयात सादर करण्यात आले. जीवीथा आणि राजशेखर यांनी चिरंजीवीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी अशा गोष्टी केल्याचा आरोप अल्लूने केला होता.

South actor Rajasekhar and his wife jeevitha arrested in Chiranjeevi blood bank case
Hardeek Joshi - Akshaya Deodhar: जय मल्हार म्हणत हार्दिकने अक्षयाला उचलले, जेजुरीतला व्हिडीओ पहाच

सुनावली शिक्षा

या प्रकरणावर प्रदीर्घ सुनावणी आणि तपासानंतर अखेर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या निर्णयान्वये जीवीथा आणि राजशेखर या दोघांना 1 वर्ष तुरुंगवास आणि 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()