Mamta Mohandas: कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्री देतेय पुन्हा गंभीर आजाराशी झुंज..

ममता मोहनदासने आधीही कर्करोगावर मात केली आहे. काही वर्षांपूर्वी तिचा कर्करोग परत आला होता.
Mamta Mohandas
Mamta MohandasEsakal
Updated on

ममता मोहनदास हि एका लोकप्रिय साऊथ अभिनेत्री आहे. तिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. ममताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या आजाराबद्दल माहिती दिली आहे.

ममता मोहनदास हिने सांगितले की, ती ऑटोइम्यून आजारने ग्रस्त आहे, त्यामुळे तिचा रंग निस्तेज होत आहे. ममताने हे सांगितल्यापासून चाहते तिला फायटर म्हणत आहेत आणि तिला या आजारातुन लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहे.


हेही वाचा: आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू.

ममता मोहनदासने सोशल मीडियावर काळ्या शर्टमधील एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कुठेतरी बसलेली आहे. तिच्या हातात ब्लॅक कॉफी आहे आणि ती कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे.

Mamta Mohandas
Makar Sankranti 2023: मराठी कलाकारांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

यासोबत तिने लिहिले की, 'डियर सन(सूर्य ), मी तुला मिठी मारते जशी यापुर्वी कधी मारली नाही. ठिपके आहेत, माझा रंग हरवत चालला आहे….रोज सकाळी मी तुझ्याआधी उठते, धुक्यातून उगवलेला तुझा पहिला किरण पाहण्यासाठी. तुमच्याकडे जे काही आहे ते दे. मी सदैव तुझी ऋणी राहीन.'

यासोबतच ममताने रंग, ऑटोइम्यून रोग, त्वचारोग आणि सूर्यप्रकाश यांसारखे हॅशटॅगही वापरले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर केवळ चाहतेच नाही तर अनेक स्टार्सही कमेंट करत आहेत आणि तिला या आजाराशी लढण्यासाठी धीर देत आहेत.

Mamta Mohandas
Rakhi Sawant: असा कसा रे तु आदिल! रडून रडून राखीची अवस्था वाईट

एकाने लिहिले, 'तु खरोखरच खूप शक्तिशाली महिला आहे, आम्हाला अशीच प्रेरणा देत राहा', तर दुसऱ्याने लिहिले, 'तु एक फायटर आहे आणि लवकरच बरी होशिल.' त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, 'तुझ्यामुळे लाखो महिलांना प्रेरणा मिळेल.'

ममता मोहनदासने आधीही कर्करोगावर मात केली आहे. काही वर्षांपूर्वी तिचा कर्करोग परत आला होता. त्यानंतर तिने अमेरिकेत उपचार घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.