'हिंदी सिनेमा म्हणजे वेळ वाया घालवणं कारण...' महेश बाबूची तिखट प्रतिक्रिया

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला बॉलीवूड पदार्णाविषयी प्रश्न विचारताच त्यानं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं अन् त्याची चर्चा रंगली.
Mahesh Babu Statement on Bollywood
Mahesh Babu Statement on BollywoodInstagram
Updated on

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूनं(Mahesh Babu) बॉलीवूड(Bollywood) पदार्पणाविषयी एक असं वक्तव्य केलं आहे जे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अर्थात याची अपेक्षा हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी तरी कधीच केली नसेल. महेश बाबूनं म्हटलं आहे,''हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे मला माझा वेळ तिथे वायाच घालवायचा नाही''. महेश बाबू सध्या आपला सिनेमा 'सरकारू वारी पाटा' या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पहात आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी त्यामधील संवादांच्या डबल मिनिंगमुळे चर्चेत होता. महेश बाबूचा हा सिनेमा १२ मे ला प्रदर्शित होत आहे. (Mahesh Babu Statement on Bollywood)

Mahesh Babu Statement on Bollywood
बिकिनीत आयरा तर शर्टलेस आमिर, बर्थे डे पार्टीतील बाप-बेटीचा 'तो' फोटो ट्रोल

महेश बाबूनं काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला आहे की, ''मी मोठ्या पडद्यावरचा हिरो आहे आणि डिजिटल म्हणजे ओटीटी पदार्पणाचा तो विचारही करत नाही''. महेश बाबूनं एका डिजिटल माध्यमाशी बोलताना आपल्या बॉलीवूड पदार्पणाविषयी देखील स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला,''बॉलीवूडला मी परवडणार नाही''. हा दाक्षिणात्य अभिनेता पुढे म्हणाला,''मला बॉलीवूडकडून फार जास्त ऑफर्स मिळाल्या नाहीत,मला वाटतं की त्यांना मी परवडणार नाही. आणि ज्यांना मी परवडणार नाही अशा इंडस्ट्रीत मला काम करायचं नाही. जे यश-प्रसिद्धी-मान मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत येऊन मिळाले आहे ते खूप जास्त आहे. त्यामुळे ही इंडस्ट्री सोडण्याचा मी कधीच विचार केला नाही. मी नेहमी चांगले सिनेमे करुन माझं नाव मोठं करण्याचा विचार करीत आलो आहे. माझी स्वप्न आता पूर्ण होत आहेत. त्यामुळे यापेक्षा अधिक काही मिळवण्याची माझी इच्छा नाही.

काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत महेश बाबूनं हिंदी सिनेमात काम करण्याच्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता,हिंदी सिनेमात काम करण्याची गरज नाही कारण तेलुगू सिनेमांना देखील देशभरात पाहिलं जातं. त्यामुळे प्रसिद्ध होण्यासाठी हिंदी सिनेमात काम करण्याची मूळीच गरज नाही.

Mahesh Babu Statement on Bollywood
उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

फक्त महेश बाबू नाही तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सना बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही. पुष्पा फेम अल्लू अर्जून ते रश्मिका मंदाना,अनष्का शेट्टी,नयनतारा आणि विजय देवरकोंडा यांनी आतापर्यंत अशा कितीतरी हिंदी सिनेमांच्या ऑफर्सना नकार दिला आहे. तसं असलं तरी आता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हिंदी सिनेसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.