Ram charan: तेलुगु सुपरस्टार राम चरणच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे. आरआरआर फेम रामचरण लवकरच बाबा होणार आहे. रामचरणची पत्नी उपासना गरोदर आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे. रामचरणचे वडील आणि तेलुगु स्टार चिरंजीवी यांनी स्वतः सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केली आहे.
चिंरजीवीने सोशल मीडियावर श्री हनुमान यांचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे,''श्री हनुमान यांच्या कृपेने आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे की उपासना आणि रामचरण लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. प्रेम आणि आभार..'' चिरंजीवी यांनी ही पोस्ट शेअर करतानाच आजोबा होणार असल्याचा आनंदही जाहीर केला.(Ramcharan and wife upasana kamineni expecting their first child.chiranjeevi tweet)
साऊथच्या बड्या स्टार्सपैकी एक रामचरण यानं २०१२ मध्ये उपासना कामिनेनीसोबत लग्न केलं होतं. हे कपल लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. काही महिन्यापू्र्वीच उपासना प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. तिनं म्हटलं होतं की, तिला सध्या बाळाला जन्म द्यायचा नाही. उपासना म्हणाली होती की, ''तिनं बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आहे आणि लोकांनी तिच्या या निर्णयाचा सम्मान करायला हवा''. आपल्या या निर्णयामागचं कारण सांगताना उपासनानं ग्लोबल वॉर्मिंगची चिंता आपल्याला भेडसावतेय असं सांगितलं होतं. त्यावेळी उपासनानं आपल्या सासूला यासंदर्भात कोणीतरी समजवा अशी विनंती देखील केली होती.
तर रामचरणनं आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, त्याचा देखील कुटुंब वाढविण्याचा विचार नाही. त्याचं म्हणणं होतं की,''सिनेमा त्याचं पहिलं प्रेम आहे आणि मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असल्याकारणानं चाहत्यांना आपल्या सिनेमाच्या माध्यमातून खूश ठेवण्याची मोठी जबाबदारी देखील आहे''. रामचरणने असं देखील म्हटलं होतं की,''जर कुटुंब वाढविण्याचा मी विचार केला तर मी जे भविष्यासंदंर्भात ठरवलं आहे त्यापासून भरकटू शकतो. उपासनाची देखील स्वतःची अशी काही ध्येय आहेत. जी तिला पूर्ण करायची आहेत. त्यामुळे दोघांचाही काही वर्ष तरी आई-बाबा होण्याचा विचार नाही''.
पण आज समोर आलेल्या बातमीवरनं तरी कळत आहे की दोघांनी आपला निर्णय बदलत कुटुंब मोठं करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनं रामचरण आणि चिरंजीवी या दोघांचे चाहते मात्र भलतेच खूश आहेत अन् त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.